Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Kohler PureWash E930
टेक्नॉलॉजीमुळे आपलं आयुष्य सोपं होतं असतं. विशेष म्हणजे बाथरूम सारख्या ठिकाणी देखील टेक्नॉलॉजी आपले कष्ट कमी करत असते. तुम्हाला आठवत असेल की गेल्यावर्षी CES २०२३ मध्ये कोहलरच्या ‘स्मार्ट’ टॉयलेटनं सगळ्यांचं लक्ष वेधलं होतं, ज्याची किंमत ११,५०० डॉलर (सुमारे ९,५४,७७२ रुपये) होती. ह्यावेळी नवीन टॉयलेट दाखवण्याऐवजी कंपनीनं PureWash E930 बिडेट टॉयलेट सीट सादर केली आहे. ही जास्त स्वस्त आहे, जी अॅलेक्सा आणि गुगल होमसह चालते. ह्यामुळे त्या लोकांना आनंद होईल ज्यांना जास्त पैसे न खर्च करता आरामदायक अनुभव हवा आहे. ही सीट याआधी खूप महाग होती, जवळपास १,७२,५०० रुपये. परंतु, आता कोहलरच्या वेबसाइटवर हिची किंमत कमी करून १,०२,३०० रुपये करण्यात आली आहे.
फीचर्स
१ लाखांपेक्षा जास्त रक्कम खर्चून तुमचं टॉयलेट बदलणं थोडं खर्चिक वाटू शकतं. परंतु कोहलरची ही PureWash E930 बिडेट टॉयलेट सीट तुम्हाला लक्झरी अनुभव देऊ शकते. ह्या सीटमध्ये अॅलेक्सा आणि गुगल असिस्टंटची सुविधा आहे, ज्यामुळे तुम्ही तुमच्या आवाजाने सीट गरम करणे, पाण्याचे तापमान बदलणे, स्प्रेचा प्रेशर कमी जास्त करणे आणि ड्राय एअर किंवा स्प्रे चालू करू शकता.
तसेच, वेगळ्या रिमोट कंट्रोल किंवा कोहलर कनेक्ट अॅपनं देखील ही कंट्रोल करता येईल. ह्यात आपोआप स्वच्छ करणाऱ्या UV लाइट सह स्टेनलेस स्टीलचा स्प्रे देखील आहे, आणि रात्री प्रकाश देण्यासाठी एक छोटी लाइट देखील आहे.