Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

रेडमीला टक्कर देण्यासाठी Realme देखील देणार 200MP कॅमेरा; Realme 12 Pro सीरीजचा टीजर आला समोर

7

रियलमीनं भारतात आपली Realme 12 Pro सीरीज लाँच होणार असल्याची बातमी कंफर्म केली आहे. ह्यात Realme 12 Pro आणि Realme 12 Pro Plus मोबाइल सादर केले जातील. विशेष म्हणजे ब्रँडनं ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्ट आणि अधिकृत वेबसाइटवर आधीच फोन्सचे टीजर सादर केले होते. तसेच, आता सोशल मीडियावर ह्या सीरिज ह्या महिन्यात सादर होईल अशी माहिती शेयर केली आहे.

Realme 12 Pro Series भारतीय लाँच

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर रियलमीनं नवीन टीजर शेयर केला आहे. ह्यात Realme 12 Pro सीरीज ह्या महिन्यात लाँच केली जाईल, अशी माहिती देण्यात आली आहे. ब्रँडनं XXजानेवारी २०२४ सह व्हिडीओ शेयर केला आहे. म्हणजे की हे फोन्स एंट्री जानेवारीत येतील, हे नक्की.

कंपनीनं आगामी मोबाइल PeriscopeOver200MP हॅशटॅगसह मार्केट केले आहेत. परंतु हा कॅमेरा प्रो की प्रो प्लस मध्ये असेल याची माहिती मात्र मिळाली नाही. आशा आहे की येत्या काही दिवसांत खरी लाँच डेट देखील शेयर केली जाईल.

Realme 12 Pro सीरीजचे स्पेसिफिकेशन्स

Realme 12 Pro फोन ब्लॅक, ऑरेंज आणि क्रीम कलरमध्ये लाँच केला जाऊ शकतो. फोनच्या बॅक पॅनलवर पिवळ्या रंगाची सेंटर पॉइंटवर स्ट्रिप दिली जाऊ शकते. डिवाइसचे दोन मॉडेल व्हीगन लेदर फिनिश आणि ग्लास बॅकसह सादर होऊ शकतात. Realme 12 Pro आणि Realme 12 Pro+ मध्ये ४,८८०एमएचची बॅटरी दिली जाऊ शकते.

Realme 12 Pro+ मध्ये स्नॅपड्रॅगन ७एस जेन २ चिपसेट मिळू शकतो. तर प्रो मॉडेल २.२ मध्ये गिगाहर्टझ क्लॉक स्पीड असलेली ऑक्टा-कोर चिप असण्याची शक्यता आहे. दोन्ही स्मार्टफोन चार स्टोरेज ऑप्शनमध्ये येऊ शकतात. ज्यात ६जीबी रॅम व १२८जीबी स्टोरेज, ८जीबी रॅम व २५६ जीबी स्टोरेज, १२जीबी रॅम व ५१२ जीबी स्टोरेज आणि १६जीबी रॅम व १टीबी स्टोरेजचा समावेश असू शकतो.

Realme 12 Pro मध्ये ५०एमपीचा प्रायमरी कॅमेरा, ३२एमपीची सेकंडरी लेन्स आणि ८एमपीचा सेन्सर मिळू शकतो. तर Realme 12 Pro+ मध्ये ६४एमपीचा ओमनीव्हिजन ओव्ही६४बी पेरिस्कोप टेलीफोटो लेन्स ३एक्स ऑप्टिकल झूम, ५०एमपी सेकंडरी लेन्स आणि ८एमपीचा दुसरा कॅमेरा दिला जाऊ शकतो. Realme 12 Pro मध्ये १६एमपी आणि Pro+ मॉडेलमध्ये ३२एमपी सेल्फी कॅमेऱ्याचा वापर केला जाऊ शकतो.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.