Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
फुकटचा सल्ला नको
पुणे विभागाच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर अजित पवार यांनी पाच जिल्ह्यांच्या घेतलेल्या आढाव्याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली. त्यावेळी एका प्रश्नावर अजित पवार संतापले. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालावर प्रतिक्रिया काय असे विचारता, ‘जे न्यायाधीश असतात, त्यांच्याकडे निर्णय देण्याची क्षमता असते त्यांनी दिलेला निकाल योग्य असतो,’ असे अजित पवार यांनी उत्तर दिले. त्यावर ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन केले का,’ याबाबत विचारता, ‘अहो, सरकार तर चालू आहे ना. त्यामुळे मी अभिनंदन कधी करायचे ते मी ठरवेन. तुम्ही कशाला सांगताय. पत्रकार मित्रांनो, तुम्हाला स्पष्ट सांगतो, मला फुकटचे सल्ले देण्याच्या भानगडीत पडू नका. मला जे वाटते ते मी बोलत असतो,’ अशा शब्दांत अजित पवार हे पत्रकारांवर चिडले.
कायदा सुव्यवस्था राखलीच पाहिजे
शरद मोहोळ यांच्या हत्येनंतर नितेश राणे यांनी कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर मोहोळ यांना ‘हिंदूत्ववादी नेते’ असे म्हटले. तसेच कात्रज धनकवडी भागात मोहोळ हे ‘देशभक्त’ असल्याचे फ्लेक्स लावण्यात आले आहे याकडे लक्ष वेधता अजित पवार म्हणाले, ‘मी पुण्यात दुपारी आलो. त्यामुळे माझी कोणाशीही चर्चा झाली नाही. मला याबाबत काही माहिती नाही. मात्र, मी पुणे, पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त आणि पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक यांच्याशी व्यवस्थित बोलेन. राज्यात कायदा सुव्यवस्था चांगली राखली पाहिजे एवढीच अपेक्षा आहे. कोणाचेही सरकार असले तरी प्रत्येक राज्यकर्त्याला राज्यातील कायदा सुव्यवस्था चांगली ठेवावी लागते. त्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करीत असतो. कोणाचे मत काय हे त्याच्याशी मला काही देणे घेणे नाही. राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून मी जे काम करतो त्या कामाबाबत माहिती द्यायला सांगायला बसलो आहे,’ असे सांगायला अजित पवार विसरले नाहीत.
राज्यात अनेक वाचाळवीर
‘आपल्याकडे राज्यात अनेक वाचाळवीर आहेत. त्यांना काही बोलल्याशिवाय झोप येत नाही. त्यांच्या प्रत्येक वक्तव्यावर बोलण्याचे माझे काम नाही. त्याबाबत प्रत्येक पक्षाकडे प्रवक्ते असतात. त्यांची ती जबाबदारी आहे. मला कामात रस आहे. नागरिकांचे प्रश्न अधिकाधिक सोडविण्यावर भर आहे. आपल्याला जे पद मिळाले आहे, त्याद्वारे प्रश्न सोडविण्याचे काम करतो,’ अशा शब्दांत प्रत्येकांच्या मतावर भाष्य करण्यास नकार देत अजित पवार यांनी उत्तर दिले.
Read Latest Maharashtra News And Marathi News
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.