Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
POCO X6 सीरिजची किंमत
कंपनीनं POCO X6 5G फोनच्या ८जीबी रॅम आणि २५६जीबी स्टोरेज मॉडेल ो १९,९९९ रुपयांमध्ये लाँच झळा आहे. ह्याचा १२जीबी रॅम आणि २५६जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत २१,९९९ रुपये आहे. ह्याचे टॉप मॉडेल १२जीबी रॅम आणि ५१२जीबी स्टोरेज व्हेरिएंटसह येतो, ज्याची किंमत २२,९९९ रुपये आहे. या फोनमध्ये ब्लॅक आणि व्हाइट कलर ऑप्शन मिळतो.
POCO X6 Pro 5G स्मार्टफोनच्या ८जीबी रॅम आणि २५६जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत २४,९९९ रुपये, तसेच १२जीबी रॅम आणि ५१२जीबी स्टोरेज मॉडेल २६,९९९ रुपयांमध्ये सादर करण्यात आला आहे. फोनची विक्री १६ जानेवारी २०२४ पासून Flipkart वर सुरु होईल. फोनमध्ये Black, Grey आणि Yellow कलर ऑप्शन मिळतात. ऑफर्स पाहता, ICICI बँक कार्डच्या माध्यमातून फोनवर २००० रुपयांपर्यंत ऑफ मिळेल.
POCO X6 5G चे स्पेसिफिकेशन्स
POCO X6 5G स्मार्टफोनमध्ये ६.६७ इंचाचा अॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट १२०हर्ट्झ आहे. हा फोन नवीन Snapdragon 7s Gen 2 प्रोसेसरसह आला आहे, सोबत १२जीबी रॅम आणि ५१२जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ह्यात ६४एमपीचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे, जो OIS ला सपोर्ट करतो. ह्यात ८एमपीचा सेकंडरी कॅमेरा आणि २एमपीचा तिसरा कॅमेरा आहे. सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी १६एमपीचा फ्रंट कॅमेरा मिळतो. फोनची बॅटरी ५,१००एमएएचची आहे, जी ६७वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
POCO X6 Pro चे स्पेसिफिकेशन्स
POCO X6 Pro फोन मध्ये ६.६७ इंचाचा क्रिस्टलरेस अॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट १२०हर्ट्झ आहे. डिस्प्लेमध्ये १८०० नीट्स पर्यंतची ब्राइटनेस देण्यात आली आहे. तसेच, हा फोन MediaTek Dimensity 8300-Ultra प्रोसेसरसह आला आहे, जोडीला १६जीबी एलपीडीडीआर५एक्स रॅम मिळतो. तसेच, फोनमध्ये १टीबी यूएफएस४.० स्टोरेज आहे.
फोटोग्राफीसाठी ह्या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ह्यात देखील ६४एमपीचा प्रायमरी कॅमेरा मिळतो, जोडीला ओआयएसचा सपोर्ट आहे. त्याचबरोबर ८एमपीचा अल्ट्रा-वाइड आणि २एमपीचा तिसरा कॅमेरा मिळतो. सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी ह्यात १६एमपीचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉइड १४ आधारित हायपरओएसवर चालतो. फोनची बॅटरी ५,०००एमएएचची आहे, जी ६७वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट मिळतो. फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.