Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Mumbai Airport: मुंबई विमानतळावर विक्रमी ४८ लाख प्रवासी; मासिक प्रवासीसंख्येचा विक्रम डिसेंबरमध्ये मोडीत
करोनापूर्व काळात मुंबईचे विमानतळ देशात दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक व्यग्र विमानतळ होते. डिसेंबर २०१८मध्ये यावरून २४ तासांत एक हजार सात इतक्या सर्वाधिक विमानांची ये-जा झाली होती. हवाई वाहतूक क्षेत्रात मे व डिसेंबर, हे महिने सर्वाधिक प्रवासीसंख्येचे असतात. यंदा मुंबईच्या विमानतळाने डिसेंबर २०२३मध्ये मासिक प्रवासीसंख्येचा विक्रम केल्याने डिसेंबरची तुलना केल्यास करोनापूर्व काळात डिसेंबर २०१९मध्ये ४३.७० लाख प्रवाशांनी ये-जा केली, तर डिसेंबर २०२२मध्ये हा आकडा ४३.३० लाख होता. तो यंदा मोडीत निघाला.
डिसेंबर महिन्यात एकूण आंतरराष्ट्रीय प्रवाशांपैकी आखाती देशांकडे जाणारे ४७ टक्के, आशिया-पॅसिफिककडे जाणारे २८ टक्के व युरोपकडे जाणारे १५ टक्के प्रवासी होते. देशांतर्गत दिल्ली, बेंगळुरू व गोवा हे अग्रणी तीन विमानतळांपैकी होते. मुंबई-दिल्लीदरम्यानच तब्बल सहा लाख २२ हजार ४२४ प्रवाशांनी ये-जा केली. १६ डिसेंबर २०२३ला सर्वाधिक एक लाख ६५ हजार २५८ प्रवाशांनी ये-जा केली. त्यामध्ये ८४ हजार १६६ आगमन झालेले व ८१ हजार ०९२ हे जाणारे प्रवासी होते, अशी माहिती हे विमानतळ चालविणाऱ्या मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडने (मिआल) दिली.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.