Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
OPPO Reno 11 चे स्पेसिफिकेशन्स
कंपनीनं ६.७ इंच अॅमोलेड पॅनल दिला आहे जो १२०हर्ट्झ रिफ्रेश रेट, २०:९ अॅस्पेक्ट रेश्यो, २४१२ x १०८० पिक्सल रेजोल्यूशनला, ९५० निट्स पर्यंत पीक ब्राइटनेस आणि एचडीआर १० प्लस सपोर्ट करतो. रेनो ११ भारतीय मॉडेल मीडियाटेक डायमेन्सिटी ७०५० चिपसेट देण्यात आला आहे. त्याचबरोबर ग्राफिक्ससाठी माली जी६८ एमसी४ जीपीयू आहे. ऑपरेटिंग सिस्टम पाहता ओप्पो रेनो ११ लेटेस्ट अँड्रॉइड १४ आधारित कलर ओएस १४ वर चालतो.
OPPO Reno 11 ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह येतो ज्यात ५० मेगापिक्सलचा सोनी एलवायटी६०० प्रायमरी कॅमेरा लेन्स, ३२ मेगापिक्सलचा आयएमएक्स७०९ टेलीफोटो लेन्स आणि ८ मेगापिक्सलचा आयएमएक्स३५५ अल्ट्रा वाइड अँगल लेन्स देण्यात आला आहे. तसेच, सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी युजर्सना ३२ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळतो.
कनेक्टिव्हिटीसाठी युजर्सना ड्युअल सिम ५जी, एनएफसी, ब्लूटूथ ५.३, आयआर ब्लास्टर, वाय-फाय ६ सारखे अनेक फीचर्स देण्यात आले आहेत. सिक्योरिटीसाठी इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक फीचर मिळत आहे. फोन वापरण्यासाठी ५०००एमएएचची बॅटरी आणि ही चार्ज करण्यासाठी ६७वॉट सुपरवूक चार्जिंगचा सपोर्ट मिळतो.
Oppo Reno 11 ची किंमत
Reno 11 5G स्मार्टफोन दोन स्टोरेज ऑप्शनमध्ये बाजारात आला आहे. डिवाइसच्या ८जीबी रॅम व १२८जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत २९,९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. Reno 11 5G मोबाइलचा ८जीबी रॅम व २५६जीबी स्टोरेज मॉडेल ३१,९९९ रुपयांचा आहे.
फोन रॉक ग्रे आणि वेव्ह ग्रीन अश्या दोन कलर ऑप्शनमध्ये आला आहे. लाँच ऑफर अंतगर्त कंपनी आयसीआयसीआय बँक कार्डवर ३,००० रुपयांचा इंस्टंट डिस्काउंट देत आहे. डिवाइस आज पासून प्री-ऑर्डर करता येईल आणि ह्याची विक्री ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्ट आणि अन्य रिटेल आउटलेट्सवर सुरु केली जाईल.