Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

राजमाता जिजाऊंचा जन्मोत्सव सोहळा, सिंदखेडराजात राजवाडा सजला, स्वराज्यजननीच्या अभिवादनास गर्दी

9

बुलढाणा : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ यांची आज ४२६ वी जयंती. राष्ट्रमाता जिजाऊ यांचं जन्मस्थळ असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथील राजे लखोजी जाधव यांच्या राजवाड्यात आज जिजाऊ जन्मोत्सव सोहळा पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला.

जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त राजे लखुजी जाधव यांच्या राजवाड्यावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली, तर राष्ट्रमाता जिजाऊंचं जन्मस्थळ आकर्षक अशा पुष्पहारांनी सजवण्यात आलं आहे.

‘तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवराय’ अशा घोषणा देत सकाळपासूनच जिजाऊंना अभिवादन करण्यासाठी नागरिक येत आहेत. सकाळीच राजे लखोजी जाधव यांच्या वंशजांनी राजमाता जिजाऊंची आरती केली आणि जिजाऊंना वंदन केले. त्यानंतर राजवाडा परिसरामध्ये फटाक्याची आतषबाजी करत जन्मोत्सव सोहळा साजरा केला गेला.

12th Fail फेम दिग्दर्शक विधू विनोद चोप्रांच्या लेकाची चमकदार कामगिरी, रणजी पदार्पणातच २५८ धावा
सकाळपासूनच राज्यातील विविध जिल्ह्यांतून नागरिक जिजाऊंच्या चरणी नतमस्तक होऊन अभिवादन करत आहे. त्यामुळे सिंदखेडराजा येथे मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. शहरासह तालुक्यातील जाधव वंशजांनी सपत्नीक महापूजा केली. यावेळी राजे विजयसिंह जाधव, शिवाजीराजे जाधव, रमेश राव व निर्मला राजे जाधव, अभय सिंह राजे जाधव, विठ्ठल राजे जाधव, आशिष राजे जाधव यांच्यासह किनगाव राजा, उमरद, सिंदखेडराजा, देऊळगाव राजा येथील वंशज यावेळी उपस्थित होते.

इंदूर सलग सातव्यांदा सर्वात स्वच्छ शहर, नवी मुंबईचाही डंका, पुण्याची टॉप-१० मध्ये एन्ट्री

नगर परिषदेची महापूजा

स्थानिक नगर परिषदेच्या वतीने अध्यक्ष सतीश तायडे यांनी सपत्नीक महापूजा केली. मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर, सर्व पक्षीय नगरसेवक यावेळी उपस्थित होते.

रिलायन्स गुजराती कंपनी, मग महाराष्ट्रात काय काम? अँटिलिया गुंडाळून गुजरातला जा, मनसेचा संताप

राजवाडा विविधरंगी फुलांनी नटला

राजवाड्यातील जिजाऊ जन्मस्थळ असलेल्या स्थानाला विविधरंगी फुलांनी सजवण्यात आले होते. संपूर्ण राजवाडा प्रकाशमय झाला होता. महिला, पुरुष, युवकांनी आकर्षक पेहराव करून जिजाऊंना अभिवादन केले.

स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या ४२६ व्या जन्मोत्सवानिमित्त सिंदखेडराजा येथील राजे लखुजीराव जाधव यांच्या राजवाड्यात जिजाऊंच्या जन्मस्थळी असलेल्या प्रतिमेची महापूजा करण्यात आली.

शिवकालीन पोवाडे म्हणत जिजाऊंच्या वंशजांकडून महापूजा संपन्न, चिमुकलेही आले शिवरायांच्या वेशात

Read Latest Maharashtra Updates And Marathi News

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.