Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

शाळकरी मुलांच्या जीवाशी खेळ, शालेय पोषण आहारात अळ्या सापडल्या, पालक आक्रमक

11

छत्रपती संभाजीनगर: शाळेमध्ये मुलांची उपस्थिती असणे, त्यांना चांगले शिक्षण आणि पोषक आहार मिळावा या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या शालेय पोषण आहारातील तांदळामध्ये अळ्या अन् उंदराची विष्टा आढळून आली.शाळकरी मुलांना दिलं जाणाऱ्या पोषण आहारातील ही धक्कादायक बाब बघून पालकांच्या पायाखालची जमीन सरकली.ही घटना सिल्लोड तालुक्यातील वांगी बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेत उघडकीस आली. यावेळी संतप्त पालकांनी शाळेत राडा केला.

या प्रकरणी मिळालेल्या अधिक माहितीनुसार, सिल्लोड तालुक्यातील वांगी बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेत राजमाता जिजाऊ यांची जयंती निमित्ताने सरपंच बापूराव काकडे व पालक हजर होते.यावेळी जयंती साजरी करताना पोषण आहार घेऊन ठेकेदारांची गाडी आली. त्यांनी पोषण आहार शाळेत उतरवला.. अचानक सरपंच बापू काकडे,पालक माधवराव तायडे,प्रकाश काकडे,ईश्वर काकडे,गजानन काकडे,लतीफ शहा, गणेश काकडे यांनी शाळेत जाऊन आलेला पोषण आहार तपासाला. आता त्यात चक्क अळया व उंदराच्या लेंडया असल्याचं त्यांच्या लक्षात आले. त्यांनी याबाबत शिक्षण विस्तार अधिकारी राजू फुसे यांना दूरध्वनी वरून माहिती दिली.त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिल्याचा आरोप सरपंच बापूराव काकडे यांनी केला आहे.

वांगी बुद्रुक येथे जिल्हा परिषदची प्राथमिक शाळा असून येथे १ ते ७ पर्यंत वर्ग आहे.यात १३३ विद्यार्थी येथे शिक्षणाचे धडे घेत आहे.हा निकृष्ट दर्जाचा आहार खाऊन जर विद्यार्थ्यांना विष बाधा झाली तर त्याला जबाबदार कोण? असा सवाल यावेळी पालकांनी शिक्षकांना केला.यावेळी पालकांनी राडा घातला.
‘त्या’ बैठकीला नार्वेकर उपस्थित होते, आता विसर पडलेला दिसतोय; सावंतांनी थेट फोटोच दाखवला

आहार बदलून देऊ

सदर पोषण आहार हा ठेकेदार पुरवठा करतो यांच्याशी आमचा संबंध नसतो. आज पुरवठा झालेल्या तांदळात अळ्या व उंदराच्या लेंड्या निघाल्या असल्याची तक्रार आली आहे. संबंधित ठेकेदाराला कळवले आहे, त्यांनी तो आहार बदलून देतो, असे सांगितले आहे. तो आहार बदलून दिला जाईल तो आहार वापरू नये अशा सूचना शिक्षकांना दिल्या आहेत, असं सिल्लोडचे शिक्षण विस्तार अधिकारी राजू फुसे यांनी म्हटलं.
मुंबईहून विमान गुवाहाटीला निघालं, बांगलादेशमधील ढाका विमानतळावर पोहोचलं, प्रवासी ९ तास अडकले कारण…

मुलांच्या जीवाशी खेळ..

हल्ली शाळांना पुरवठा केला जाणारा आहार हा निकृष्ट दर्जाचा येत आहे.काही दिवसांपूर्वी धोत्रा येथील पोषण आहारात तर चक्क मेलेला उंदीर निघाला होता. वांगी बुद्रुक येथील आहारात चक्क अळ्या व उंदराच्या लेंड्या निघाल्या हा तर विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार आहे, याची वरिष्ठ पातळीवर चौकशी होऊन दोषी विरुद्ध कठोर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी वांगी बुद्रुकचे सरपंच बापूराव काकडे यांनी केली.
Nitish Kumar : इंडिया आघाडीचे संयोजक होण्यास नितीशकुमारांचा नकार, अखेर मल्लिकार्जून खरगेंवर मोठी जबाबदारीRead Latest Maharashtra News And Marathi News

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.