Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
पुणे,दि१४ :- पुण्यात एका साप्ताहिकाचा व डिजिटल वेबसाईटचा संपादक व पत्रकार असल्याची बतावणी करून पुण्यातील लष्कर परिसरातील एका व्यावसायिकाकडून दरमहा हप्ता मागणाऱ्या तीन जणांविरुद्ध लष्कर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. भूषण साळवे (४५), संदीप रासकर (वय ४३), अक्षय वाघमारे (वय ३०) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत राजेश जनार्दन श्रीगीरी (रा. लष्कर) यांनी लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
Thank you for reading this post, don’t forget to subscribe!
या बाबत मिळालेली माहिती अशी की, भुषण साळवे याने फिर्यादी राजेश श्रीगीरी यांना फोन करून पत्रकार असल्याचे सांगितले. तुम्ही बालाजी सोशल क्लबच्या नावाखाली पत्त्यांचा क्लब चालविता तसेच तुम्ही अवैध धंदे देखील करत आहेत. मला हप्ते सुरु करा, नाहीतर मी तुमच्या क्लबबद्दल वर्तमानपत्रात बातम्या छापेल. तसेच पोलिसांकडे तक्रार देऊन गुन्ह्यात अडकविण्याची धमकी भुषण सावळे याने श्रीगीरी यांना दिली. माझा सहकारी संदीप रासकरच्या मोबाईल नंबरवर दर महिन्याला 3 हजार रूपये द्यावे लागतील, असे धमकावत दोन महिन्यांचे 6 हजार रूपये त्याने घेतले. त्यानंतर अक्षय वाघमारेने श्रीगीरी यांना प्रत्यक्ष भेटून स्वतः पत्रकार असल्याचे सांगुन श्रीगीरी यांच्याकडे दर महिन्याला हप्ता स्वरूपात पैशाची मागणी केली. त्यामुळे सदर गन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी राजेश जनार्दन श्रीगीरी (53, रा. वेस्ट स्ट्रीट कॅम्प, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. हा गुन्हा 15 ते 20 जुलै 2023 आणि 21 ते 22 ऑगस्ट 2023 रोजी रात्री पावणे बारा वाजता कॅम्प परिसरातील वेस्ट स्ट्रीट येथे घडला.
श्रीगीरी हे राजकारणात सक्रिय आहेत. ते हैदराबाद या मुळ गावी गेल्याने त्यांनी पुण्यात परत आल्यानंतर तात्काळ पोलिसांकडे तक्रार दिली. लष्कर पोलिसांनी भुषण साळवे, संदीप रासकर आणि अक्षय वाघमारे यांच्याविरूध्द दि.१२/१/२०२४ रोजी खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. व लवकर त्या पत्रकारांना अटक करून पुढील तपास सुरू करण्यात येणार आहे पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक गायकवाड करत आहे
पुणे परिसरात तोतया पत्रकारांचा
सुळसुळाट
पुण्यातील काही व्यवसाय यांची अर्धवट माहिती काढून त्याची पूर्ण खात्री न करता काही तोतया पत्रकार त्या व्यवसाय काला पोलिसांकडे तक्रार करण्याची धमकी देत धमकावून पैसे मागण्याचा प्रकार समोर आला आहे तर आशा व्यवसायकाने पैसे न दिल्यास ११२ ला कॉल करून काही चुकीची माहिती देऊ पोलिसांनाही त्रास देताना हि दिसून येत आहे अशा तोतया पत्रकारांनवर कारवाई कदी होणार ? असा सवाल पुण्यातील काही व्यवसायिकांना हि पडला आहे