Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

rane criticizes raut: चिपी विमानतळावर कागदाचं विमान उडवणार का?; नितेश राणेंचे टीकास्त्र

63

हायलाइट्स:

  • आमदार नितेश राणे यांची खासदार विनायक राऊत यांच्यावर टीका.
  • चिपी विमानतळावर कागदाचे विमान उडवणार का?- राणे यांचा टोला.
  • चिपी विमानतळाला अद्याप विमान वाहतुकीची परवानगी मिळालेली नाही- राणे.

मुंबई: सिंधुदुर्गातील चिपी या विमानतळावरून (Chipi Airport) ७ ऑक्टोबर या दिवशी पहिले विमान उड्डान करेल अशी माहिती शिवसेनेचे खासदार विनायक राऊत (MP Vinayak Raut) यांनी जाहीर केली आहे. यावरून आमदार नितेश राणे (MLA Nitesh Rane) यांनी राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. चिपी विमानतळासाठी अजूनही डीजीसीएची परवानगी मिळालेली नसताना ही ७ ऑक्टोबरची तारीख कोठून आणली, हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना काय कागदाचे विमान उडवून दाखवणार आहेत का?, असा सवाल आमदार नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे. (mla nitesh rane criticizes shiv sena mp vinayak raut regarding his statement about chipi airport in sindhudurg)

राऊत यांच्यावर टीका करताना रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाला बॅरिस्टर नाथ पै, मधु दंडवते, सुरेश प्रभू आणि नीलेश राणे यांचा वारसा लाभलेला आहे. आज हे दुर्दैव आहे की एक बुद्धू खासदार आम्हाला मिळाला आहे, अशा शब्दांत नितेश राणे यांनी राऊत यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

क्लिक करा आणि वाचा- करोना: राज्यात आज ४,०४७ नवे रुग्ण आढळले; ‘अशी’ आहे ताजी स्थिती!

नितेश राणे यांच्याप्रमाणेच नीलेश राणे यांनीही राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. खासदार विनायक राऊत यांनी एक पत्र जाहीर केले असून त्यात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना चिपी विमानतळाच्या उद्घाटनासाठी आमंत्रित केले आहे, असे सांगत त्यांनी शेलक्या शब्दात खासदार राऊत यांच्यावर टीकेची झोड उठवली. विनायक राऊत हे बिनडोक असल्याचे आपण अनेक वर्षांपासून सांगत आहोत. आम्ही नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडे या बाबत चौकशी केली असता, अशा प्रकारची कोणतीही परवानगी अद्याप दिली गेली नसल्याचे त्यांनी आम्हाला सांगितले. अधिकृत नोटिफिकेशनही निघालेले नाही. मग असे असताना हे खासदार कोणत्या अधिकाराखाली उद्घाटनाचे कार्यक्रम अधिकाऱ्यांना करायला सांगत आहेत, असा सवाल नीलेश राणे यांनी विचारला आहे.

क्लिक करा आणि वाचा- राजू शेट्टींचे जलसमाधी आंदोलन तात्पुरतं स्थगित; मुख्यमंत्र्यांचा ‘हा’ प्रस्ताव

ज्यांनी कधी ऑटोस्टॅंड बांधला नाही, अचानक त्यांना मतदारसंघ मिळाला आणि विमानतळाच्या उद्घाटनाचा विषय निघाला की ते असेच वाबचळणार, असे सांगत विनायक राऊत ही बोगसगिरी थांबवा असे आवाहन त्यांनी राऊत यांना केले आहे.

क्लिक करा आणि वाचा- करोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका; मुख्यमंत्र्यांचे रुग्णालयांना ‘हे’ कळकळीचे आवाहन

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.