Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

possible third wave of corona: करोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका; मुख्यमंत्र्यांचे रुग्णालयांना ‘हे’ कळकळीचे आवाहन

7

हायलाइट्स:

  • करोनाच्या संभाव्या तिसऱ्या लाटेशी सामना करण्यासाठी राज्य सरकार सज्ज.
  • सर्व सेवा-सुविधांचे ऑडिट करून घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे रुग्णालयांना आवाहन.
  • ऑक्सिजनची मर्यादा लक्षात घेता सर्वांनीच जबाबदारीने वागणे आवश्यक- मुख्यमंत्र्यांचे आवाहन.

मुंबई: राज्यातील करोना संसर्ग नियंत्रणात असला तरी करोनाची दुसरी लाट अजूनही ओसरलेली नाही. अशी परिस्थिती असताना आता संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोकाही जवळ येऊ लागला आहे. हे लक्षात घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील रुग्णालयांना महत्वाचे आवाहन केले आहे. आपला शत्रू अजून पूर्णपणे पराभूत नाही. त्याचा बंदोबस्त करण्यासाठी आपण सर्वांनी सज्ज राहणे आवश्यक आहे. आरोग्य सुविधा मग ते ऑक्सिजन, रुग्णशय्या, औषधे, व्हेंटिलेटर्स असो की अन्य इलेक्ट्रिक यंत्रसामग्री या सगळ्याच गोष्टी सतत वापरात असल्याने त्यांची काळजी घेणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे सर्व रुग्णालयांनी या गोष्टींचे ऑडिट करून घ्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. (a possible third wave of corona heartfelt appeal of cm uddhav thackeray to hospitals)

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला रोखून विषाणूंविरुद्धचे हे युद्ध जिंकण्यासाठी आणि कोरोनाच्या संकटातून पूर्णपणे बाहेर येण्यासाठी राज्य शासनाने वेगाने आरोग्य सुविधांमध्ये वाढ केलेली आहे, असे असले तरी ऑक्सिजनची मर्यादा लक्षात घेता सर्वांनीच जबाबदारीने वागण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले.

क्लिक करा आणि वाचा- शरद पवारांनी पाठीत खंजीर खुपसल्याचे एक उदाहरण द्या, राजकारण सोडेन- संजय राऊत यांचे आव्हान

‘तर आपण करोनाच्या संकटातून कधीच बाहेर येणार नाही’

कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला रोखण्याच्या उपाययोजनांबाबत कोविड राज्य कृतीदलाने आयोजित केलेल्या ‘माझा डॉक्टर’ या ऑनलाईन वैद्यकीय परिषदेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज उद्घाटन झाले, त्याप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. आजच्या शिक्षणदिनी शिक्षण क्षेत्राला दिशा देणाऱ्या डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना अभिवादन करून कोरोनाने आपल्याला जे धडे शिकवले त्यातून आपण काय शिकलो याचा विचार करून या संकटाचा बिमोड करायचा आहे. प्रत्येक पाऊल सावधानतेने आपण टाकतो आहे. ही सगळी काळजी घेतांना अनेकांना सगळ्या गोष्टी उघडण्याची घाई आहे. पण आपण ज्या गोष्टी उघडत आहोत त्या पुन्हा बंद होऊ नयेत याची काळजी घेण्याचीही गरज आहे. ती घेतली नाही तर आपण या कोरोनाच्या संकटातून कधीच बाहेरच पडणार नाही. यामुळे कोरोना सदैव आपल्यासोबत राहण्याची शक्यता वाढू शकते. तसे होऊ नये म्हणून काळजी घेण्याची गरजही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.

क्लिक करा आणि वाचा- महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांनी ‘त्या’ क्षणाबद्दल सांगितले, म्हणाले…

‘सगळी शस्त्रे परजून ठेवण्याची गरज’

तिसरी लाट येऊ नये आणि आलीच तर घातकता कमी करण्याची गरज आहे. कोरोनाविरुद्धचे जर हे युद्ध आहे असं आपण मानतो तर आपली सगळी शस्त्रे परजवून ठेवण्याची गरज आहे. मग आपली शस्त्रे काय आहेत, तर डॉक्टर, नर्सेस, पोलीस, अग्निशमनदल कर्मचारी सगळेच कोरोना योद्धे आहेत, त्याचबरोबर रुग्णालय व्यवस्था, यंत्रसामग्री, औषध उपलब्धता या सगळ्या गोष्टीही महत्वाच्या आहेत. अजून राज्यात दुसरी लाट कायम आहे आणि तिसऱ्या लाटेची शक्यता सांगितली जात आहे मग त्याचा बंदोबस्त करण्याची गरज आहे त्यासाठी आपण ही सज्ज राहण्याची आवश्यकता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली.

क्लिक करा आणि वाचा- किरीट सोमय्यांचे मुख्यमंत्र्यांना हे खुले आव्हान; म्हणाले, ‘हिम्मत असेल तर…’

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.