Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

गौखनिजाची विनापरवाना चोरी करुन वाहतुक करणारे समुद्रपुर पोलिसांचे जाळ्यात…

7

अवैद्यरित्या रेती उत्खल्लन करून चोरून वाहतुक कारणाऱ्यावर समुद्रपुर पोलिसांचा कार्यवाहीचा बडगा, ट्रॅक्टर व रेती असा एकुन किंमत 18,15,000/-  रू मुद्देमाल जप्त २ आरोपी अटकेत….

वर्धा(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,अवैध धंद्यांचे समुळ उच्चाटन करण्यासाठी पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांनी वर्धा जिल्ह्यातील सर्व प्रभारी यांना आदेशीत केले होते त्सानुसार
दिनांक  14/01/2022 रोजी सहायक पोलीस निरिक्षक संतोष शेगावकर यांच्या सह नायक पोलिस शिपाई प्रमोद थुल यांचे गुन्हे प्रकटीकरण पथक पोलिस स्टेशन समुद्रपूर परीसरात पेट्रोलींग करीत असता, त्यांना गोपनिय खबर माहीती मिळाली कि, मौजा
मेनखात शिवारातील वणा नदीतुन अवैध रित्या रेतीचे उत्खल्लन करून त्याची ट्रॅक्कटरच्या साहाय्याने त्याची वाहतुक करीत  आहे. अशा माहीती वरून मौजा जाम ते मेनखात रोडवर योग्य सापळा रचला  असता जाम कडे मेनखात रोडने तिन ट्रॅक्टर येत असताना दिसले त्यांना थांबवुन त्यांची  पाहणी केली असता त्यामध्ये रेती भरून मिळुन आली. त्यांना त्यांचे नाव गाव  विचारले असता त्यांनी आपले नावे पुढील प्रमाणे सांगितले

1) चालक मनोज कुडलिक उईके वय 22 वर्षे रा. मेनखात ट्रॅक्टर मालक

2) अजु खेडेकर रा. जाम

3) चालक सुरज सुरेश धोटे वय 25 वर्षे रा. किन्हा खरडा ता. समुद्रपूर ट्रॅक्टर मालक
4) होमलाल जगरा रा. हिंगणघाट 5) पसार चालक धिनज मारोती मडावी रा. उबदा

असे सागितले.त्यांच्या कडुन ट्रॅक्टर, टॅाली व रेती सह एकुण  किंमत 18,15,000 रू चा माल जप्त करण्यात आला. सदरचा मुद्देमाल जप्त करून ताब्यात घेतला. व याबाबत पोलिस स्टेशन समुद्रपूर येथे खालील कलमान्वये

1) अप. क्र. 26/2024 कलम 379, 34 भा. द. वि. सहकलम 3(1).181,130.50 (1).177 मो. वा. का.

2) अप. क्र. 27/2024 कलम 379, 34 भा. द. वि. सहकलम 3(1),181,130,50 (1).177 मो. वा.का. अप. क्र. 28/2024 कलम 379 भा. द. वि. सहकलम 3(1).181,130,50 (1).177 मो. वा. का.

गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास सुरू आहे.
सदरची कामगीरी नूरुल हसन, पोलिस अधीक्षक, डॅा सागर कवडे, अपर पोलिस अधीक्षक,वर्धा, रोशन पंडीत उपविभागीय पोलिस अधिकारी, हिंगणघाट, स.पो. नि. संतोष शेगावकर  पोलिस
स्टेशन, समुद्रपूर यांचे मार्गदर्शनात गुन्हे प्रकटीकरण पथकाचे नापोशि प्रमोद थुल, सचिन भारशंकर, राजेश शेंडे, पोशि प्रमोद जाधव, समिर कुरेशी यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.