Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
(जिल्हा संपादक:शैलेश चौधरी)
जळगाव :५ सप्टेंबर २०२१ रोजी सावदा येथून मुंबईला गोमांस घेऊन जाणारा आयशर ट्रक रात्री ११.४५ च्या सुमारास जळगावातील कालिंका माता चौकात पकडण्यात आला. केळीच्या खोड आणि पानांमागे प्लास्टिक टाकीत लपवून गोमांस तस्करी केली जात होती. घटनास्थळी मोठा जमाव जमला होता परंतू पोलिसांनी धाव त्वरीत घेतली असता कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
याबाबत सविस्तर असे की, सावदा येथून मुंबईला गोमांस घेऊन जाणारा आयशर ट्रक रात्री ११.४५ च्या सुमारास जळगावातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी कालिंका माता मंदिर चौकाजवळील महामार्गावर पकडला. संशय आल्याने काही गोरक्षक भुसावळपासून या आयशरचा पाठलाग करीत होते.गोरक्षकांनी वाहन थांबविताच चालक आणि क्लिनर पळ काढत होते. जमावाने चालकाला पकडून शनिपेठ पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.वाहनात प्लास्टिक टाकीत मांस भरून त्यावर केळीची पाने आणि खोड झाकलेले होते. केळीचे उत्पादन किंवा इतर साहित्य त्यातून नेले जात असेल असा अंदाज येत होता मात्र टाकीत मांस आढळून आल्याने सर्वांचा संताप झाला. ट्रक जळगावात एमआयडीसी पोलीसांच्या ताब्यात देण्यात आला असून घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती. सहाय्यक अधीक्षक कुमार चिंथा यांनी घटनास्थळीभेट दिली आहे. यावेळी नगरसेवक प्रवीण कोल्हे यांच्यासह काही नागरीक तसेच शनीपेठ व एमआयडीसी पोलिसांनी शांतता राखण्यासाठी प्रयत्न केले.