Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

सहानुभूतीची लाट स्वपक्षीयांनीच अडविली? फायटर धानोरकरांच्या मतदारसंघात लोकसभेसाठी ८ जण इच्छुक

11

चंद्रपूर : लोकसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत भाजपाने काँग्रेसमुक्त भारताचा नारा दिला. या निवडणुकीत भाजपने दणदणीत यश मिळवत मोदी लाट ओसरली नसल्याचं दाखवून दिलं. परंतु इकडे महाराष्ट्रात काँग्रेसमुक्त महाराष्ट्र होण्यापासून चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघाने वाचवलं. केवळ चंद्रपूर जिल्हातील एकमेव उमेदवार बाळू धानोरकर महाराष्ट्रातून काँग्रेस खासजदार झाले. खासदार धानोरकर यांनी मोदी लाट ताकदीने परतवून लावली. हा पराभव भाजपाला जिव्हारी लागला. त्यामुळेच की काय या मतदार संघात भाजपाने आपलं लक्ष केंद्रित केलं आहे. या मतदारसंघात भाजपाचे इव्हेंट वर इव्हेंट सुरू आहेत. काँग्रेसमध्ये मात्र अंतर्गत कलह दिसून येत आहे. खासदार धानोरकर यांच्या निधनाने आमदार प्रतिभा धानोरकर यांच्याबाबतची सहानुभूतीची लाट या मतदार संघात दिसत आहे. मात्र ही लाट काँग्रेसमधीलच काही नेते अडवू पाहत आहेत की काय असा प्रश्न विचारला जात आहे. आमदार प्रतिभा धानोरकर यांच्यासह लोकसभेची ही जागा आपल्याला मिळावी यासाठी सात जणांनी रितसर अर्ज केला आहे. पक्षासाठी ज्यांचं नखभर कार्य नाही, असे काँग्रेसमधील नवखेही लोकसभा लढविण्यासाठी उतावीळ झाले आहेत.

चंद्रपूर-आर्णी लोकसभा मतदार संघांसाठी काँग्रेसची चाचपणी सुरु झाली आहे. काँग्रेसचे प्रदेश समितीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघासाठी इच्छुक उमेदवारांकंडून अर्ज मागविले होते. या मतदारसंघासाठी काँग्रेस मध्ये आठजण इच्छुक आहेत.

कोकणवासियांनो जमिनी विकू नका, अन्यथा कपाळाला हात लावण्याची पाळी येईल; राज ठाकरेंचा इशारा
चंद्रपूर जिल्हा कॉग्रेस समितीचे अध्यक्ष तथा राजुराचे आमदार सुभाष धोटे यांच्याकडे जिल्हा कॉग्रेसचे माजी अध्यक्ष विनायक बांगडे, बल्लारपूरचे माजी नगराध्यक्ष दिलीप माकोडे, युवक कॉग्रेसचे अध्यक्ष शंतनु धोटे, चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दिनेश चोखारे तथा शिवा राव यांनी उमेदवारीसाठी अर्ज केले आहेत. चंद्रपूर जिल्हा शहर काँग्रेस समितीचे अध्यक्ष रामू तिवारी यांच्याकडे काँग्रेसच्या आमदार प्रतिभा धानोरकर, माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे व वरोरा येथील डॉ. हेमंत खापने यांनी उमेदवारीसाठी अर्ज दिलेत. या आठही इच्छुकांचे अर्ज प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले आहेत.

सलग दहा वर्ष भाजपाच्या ताब्यात असलेला हा मतदार संघ २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडे परत आणण्याचा दिव्य पराक्रम दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांनी केला. विखुरलेल्या कार्यकर्त्यांना एक केलं, जातीय समीकरणे जुळवून आणली. त्याचा सकारात्मक परिणाम विधानसभेच्या निवडणुकीतही दिसून आला. वरोरा-भद्रावती मतदार संघात खासदार धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांचा विजय झाला. मागील काही महिन्यांपूर्वी खासदार धानोरकर यांचं दीर्घ आजाराने निधन झालं. त्यामुळे हा मतदार संघ पोरका झाला. खचलेल्या कार्यकर्त्यांना धीर देण्याचं कार्य प्रतिभा धानोरकर यांनी केलं. त्यामुळे या मतदारसंघात त्यांच्याबाबत मोठी सहानुभूती आहे. ही सहानुभूती मतदानात रुपांतरित होऊ शकते, अशी चर्चा आहे. मात्र आता पक्षातील सात जणांनी लोकसभेच्या या जागेवर दावा केल्याने ही जागा मिळविण्यासाठी पक्षात सुरु असलेली स्पर्धा भाजपासाठी फायदेशीर ठरू शकते. त्याचवेळी काँग्रेससाठी मारक ठरणारी आहे.

ट्रेनमध्ये उर्दूत संभाषण ऐकलं, ‘मातोश्री’बाहेर घातपाताचा कट, नियंत्रण कक्षाला फोनवरुन दावा

दोन जिल्ह्यातील मतदार ठरवितात खासदार

चंद्रपूर-वणी-आर्णी मतदारसंघात चंद्रपूर, राजुरा, बल्लारपूर, वरोरा, वणी, आर्णी असे सहा मतदारसंघ येतात. यातील वणी आणि आर्णी हे दोन मतदारसंघ यवतमाळ जिल्ह्यातील आहेत. चंद्रपूरमधून अपक्ष किशोर जोरगेवार, राजुरामधून काँग्रेसचे सुभाष धोटे, बल्लारपूरमधून भाजपचे सुधीर मुनगंटीवार तर वरोरा मतदारसंघातून काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर तसेच वणी मतदारसंघातून भाजपचे संजीव बोदकुलकर आणि आर्णीमधून याच पक्षाचे डॉ. संदीप धुर्वे हे निवडून आले आहेत. लोकसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर यवतमाळ जिल्ह्यातील वणी आणि आर्णी हे मतदारसंघ चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाशी जोडले. या दोन्ही जिल्ह्यातील मतदार प्रामुख्याने खासदार ठरवित असतात.

बारामतीसाठी सोशल इंजिनिअरिंग, मावळसाठी दत्तात्रय भरणे, शिरूरसाठी दादांकडून तगडा फिल्डर!

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.