Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
सिंधुदुर्गातील देवगड तालुक्यातील पोयरे या छोटेशा गावामध्ये अगदी कोणत्याही प्रकारची लागवड होऊ शकत नाही. अशा खडकाळ भागामध्ये एक ते दोन कि.मी अंतरावरून असलेल्या नदीतून पाणी मोटर साहाय्याने आणून कलिंगड आणि त्याच्या जोडीला बेडगी मिरचीची लागवड पोयरे गावातील संजय माटवकर शेतकरी यांनी केली आहे. त्यामुळे या खडकाळ भागामध्ये मेहनतीच्या जोरावर यश संपादन केले आहे. सुरुवातीला संपूर्ण तीन एकर क्षेत्र ट्रॅक्टरच्या साहाय्याने नांगरून त्याची योग्य मशागत केली. तीन एकर क्षेत्रामध्ये गादी ऑफे तयार केले. त्यानंतर शेंद्रीय खत टाकून मचिंग पेपर वापर करून बेडगी मिरची रोप आणि कलिंगडची लागवड केली.
या तीन एकर क्षेत्रामध्ये ऑगस्टा जातीची कलिंगड आणि बेडगी जातीची मिरचीची लागवड केली आहे. शेतकरी संजय माटवकर यांचे सहकारी नंदकुमार माटवकर यांनी शुद्ध ही लागवड करण्यासाठी विशेष मेहनत घेतली आहे. पाण्याचं योग्य नियोजन करून या खडकाळ भागामध्ये शेती फुलवली आहे. कलिंगड ऑगस्टा असून मिरची बेडगी एक नंबर जातीची आहे. ही सर्व बियाणे तीन महिन्यांच्या कालावधीची आहे. तीन महिन्यानंतर उत्पन्न देण्यास तयार होतात. सध्या लोकल मार्केटला बेडगी मिरचीचा ७०० रुपये दर आहे. तर कलिंगडचा दर कमी जास्त असल्यामुळे १८ किंवा २० त्याचप्रमाणे २५ या प्रति रुपये किलो दराने मार्केटला देतो. कलिंगड हे जास्त काळ शेतामध्ये राहील तर खराब होत त्यामुळे कलिंगड हे ठराविक कालावधीतच मार्केटला विक्रीला जाणं अपेक्षित आहे.
होलसेल घेणारे जे ग्राहक आहेत त्यांना कलिंगड देतो. गोवा, बांदा, मालवण, देगवड या ठिकाणी कलिंगड पाठवलं जात. छोटे जे शिल्लक कलिंगड राहतील ते आम्ही जवळच्या मार्केटमध्ये विकतो. बेडगी मिरची आम्ही शक्यतो बाहेर मार्केटला विकण्यापेक्षा आमचा स्वतः चा मसालेचा व्यवसाय असल्यामुळे आम्ही स्वतःच्या मसाल्यांसाठी वापरतो. तीन एकर क्षेत्रावर लागवड केलेली मिरची ५०० किलोपर्यत मिरचीची कटिंग केली आहे. त्यातून निव्वळ नफा अडीज लाख रुपये मिळाले. त्याप्रमाणे कलिंगडमधून एक लाख ऐंशी हजार रुपये नफा मिळाला आहे. जवळपास दोन्ही उत्पादनाचा विचार केला तर त्यातून चार लाख रुपये निव्वळ नफा मिळाला आहे, असे शेतकऱ्यांनी सांगितले.