Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
शुल्लक कारणावरुन जन्मदाती आई,बाप व लहान भावास मारुन अपघाताचा बनाव करणाऱ्या मोठ्या मुलाचा डाव हिंगोली पोलिसांनी उधळला…
आई, वडील व सख्या भावाचा खुन करून अपघाताचा बनाव करणाऱ्यास ठोकल्या बेडया,(स्थानिक गुन्हे शाखा, हिंगोली व पोलिस स्टेशन,बासंबा यांची संयुक्त कार्यवाही..
हिंगोली(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस अधीक्षक हिंगोली जी. श्रीधर हे हिंगोली पोलिस घटकामध्ये दाखल होणाऱ्या प्रत्येक गुन्हयावर अत्यंत बारकाईने लक्ष ठेवतात व गुन्हे उघडकीस आणण्याबाबत वेळोवेळी मार्गदर्शन करतात. त्यानुसार
दि. ११/०१/२०२४ रोजी पोलिस स्टेशन बासंबा येथे माहिती प्राप्त झाली की डिग्रसवाणी गावाजवळ रोडच्या बाजुला खडयामध्ये मोटार सायकलचा अपघात होवुन एक महिला व दोन पुरूष मृत अवस्थेत पडले आहेत,अशी माहिती प्राप्त होताच पो.स्टे. बासंबाचे सपोनि. विलास चवळी व पथकाने घटनास्थळी भेट दिली व मृतांची ओळख पटवली असता ते
१) कुंडलीक श्रीपती जाधव, वय ७० वर्ष,
२) कलावती कुंडलीक जाधव, वय ६०वर्ष, व
३) आकाश कुंडलीक जाधव, वय २७ वर्ष,
तिन्ही रा. डिग्रसवाणी असल्याचे समजले. सदरची घटना हि
प्रथम दर्शनी अपघात होवुन तिघांचाही मृत्यु झाला असावा अशी वाटत होती. पोलिसांनी तिन्ही बॉडी ताब्यात घेवुन शवविच्छेदन करून, पुढील कायदेशीर कार्यवाही केली. पोलिसांच्या चाणाक्ष नजरेपुढे सदरचा अपघात बाबत अनेक प्रश्न उपस्थीत होत होते. तसेच अपघाताबाबत माहिती देणारा दुसरा मुलगा
महेंद्र कुंडलीक जाधव, वय ३२ वर्ष
हा आई, वडील व छोटा भाऊ रात्री सिरसम येथे हॉस्पीटलला जात असतांना अपघात झाला असावा अशा प्रकारची माहिती पोलिसांना देत होता. पोलिसांना त्याच्या सांगण्यावर सुध्दा संशय येते होता. परंतू तो अधिक सविस्तर माहिती देत नव्हता तसेच अनेक प्रश्नांची
उत्तरे उडवा उडवीची देत होता.
सदर गुन्हयाचे गांभीर्य ओळखुन जिल्हा पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी सदर घटनेचा बारकाईने अभ्यास करून सत्य घटना समोर आणण्यासंदर्भाने स्थानिक गुन्हे शाखा पोलिस निरीक्षक विकास पाटील यांना सुचना देवुन त्यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि शिवसांब घेवारे यांचे पथक बासंबा येथे रवाना केले. गुन्हे शाखेने संशईत इसम नामे महेंद्र कुंडलीक जाधव, वय ३२ वर्ष, रा. डिग्रसवाणी यास ताब्यात घेवुन अत्यंत कौशल्यपुर्वक विचारपुस तंत्राचा अवलंब करून एका पाठोपाठ प्रश्नांचा भडीमार केला व पोलीसी खाक्या दाखवताच संशईत आरोपी महेंद्र कुंडलीक जाधव याने त्याचे आई, वडील व भाऊ हे त्यास पैसे देत नाहीत व नातेवाईकांमध्ये सतत बदनामी करतात याचा राग मनात धरून दिनांक ०९.०१.२०२४ रोजी रात्री भावाला झोपेच्या गोळया देवुन तसेच शॉक देवुन व डोक्यात रॉड घालुन खुन करून बॉडी त्याच रात्री रोडलगत नाल्यामध्ये टाकल्याचे सांगीतले. तसेच
दि. १०.०१.२०२४ रोजी दुपारी आईला सुध्दा झोपेच्या गोळया देवुन स्वतःच्या शेतात नेवून डोक्यात रॉड घालुन खुन करून बॉडी परत रोडलगत त्याच ठिकाणी नेवुन टाकल्याचे सांगीतले. तसेच परत घरी येवून मध्यरात्री वडीलांना सुध्दा झोपेच्या गोळया देवुन डोक्यात रॉड घालुन बॉडी स्वतःच्या मोटार सायकलने रोडलगत नाल्यात भावाच्या व आईच्या बॉडीजवळ मोटार सायकलसह टाकल्याचे सांगीतले. तसेच कोणाला संशय येवु नये म्हणून मोटार
सायकलचे हेडलाईट फोडुन अपघाताचा बनाव केल्याचे सांगीतले. दिनांक १५/०१/२०२४ रोजी संतोष कुंडलीक जाधव यांचे फिर्यादीवरून पोलिस स्टेशन गुरनं. ०८/२०२४ कलम ३०२, ३२३, ५०४, ५०६, २०१ भादंवी. प्रमाणे आरोपी महेंद्र कुंडलीक जाधव, वय ३२ वर्ष, रा. डिग्रसवाणी, ता. जि. हिंगोली याचेवर गुन्हा दाखल करण्यात आला असुन, आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे.
.
आरोपीने अतिशय थंड डोक्याने स्वतःच्या आई, वडील व भावाचा खुन करून अपघाताचा बनाव केलेली घटना उघडकीस आणली आहे.
सदरची कार्यवाही पोलिस अधीक्षक जी. श्रीधर,अपर पोलिस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील, उपविभागीय पोलिस अधीकारी हिंगोली शहर, सुधीर दळवे पो.नि. स्था. गु. शा. हिंगोली विकास पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि.विलास चवळी, पो.स्टे. बासंबा, सपोनि शिवसांब घेवारे, स्था. गु. शा. हिंगोली, पोउपनि गुलाब खरात, पोलिस अंमलदार नानाराव पोले, बाबाराव धाबे, राहुल तडकसे, उमर शेख, राजु ठाकुर, नितीन गोरे, आकाश टापरे, नरेंद्र साळवे, आझम प्यारेवाले, प्रशांत वाघमारे यांनी केली आहे.