Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
सर्व विद्यार्थी व महाविद्यालयांनी विद्यापीठाच्या संकेतस्थळास भेट देऊन आपला मराठीतील (देवनागरी ) नावाचा तपशील अचूक आहे का हे पहावे व आवश्यक त्या दुरुस्त्या कराव्यात असे आवाहन विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रसाद कारंडे यांनी केले आहे.
तसेच जे विद्यार्थी आणि महाविद्यालये वरील लिंकवरून डेटा मिळवू शकत नाहीत किंवा त्यांना महाविद्यालयाचे नाव, विद्यार्थ्यांचे नाव, ग्रेड इत्यादींबाबत काही शंका असल्यास त्यांनी २३ जानेवारी २०२४ पूर्वी muconvo2023@mu.ac.in या ईमेल आयडीवर ईमेल पाठवावा असे गुण व प्रमाणपत्रे विभागाचे उपकुलसचिव हिम्मत चौधरी यांनी सांगितले.
मराठीतील (देवनागरी ) नावाचा तपशील पाहण्यासाठी महाविद्यालय व विद्यार्थ्यांसाठी संकेतस्थळावर खालीलप्रमाणे स्वतंत्र लिंक दिलेली आहे.
1. www.mu.ac.in -> Exam & Result -> Examination -> Convocation Marathi Name Correction for Colleges
(The Login ID & Password will be provided by the University )
2. www.mu.ac.in -> Exam & Result -> Examination -> Convocation Marathi Name Correction for Students