Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
धारावीकरांसाठी मोठी बातमी, कोणत्याही झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पापेक्षा १७ टक्के जास्त कार्पेट एरिया मिळणार
सर्व धारावीकरांसाठी नवीन सदनिका या स्वप्नातील घरं असतील आणि त्यांचं राहणीमान उंचावतील. धारावी पुनर्वसन प्रकल्पात धारावीचा आत्मा अबाधित राखून ही स्वप्नं आणि आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत, असं धारावी पुनर्वसन प्रकल्प प्रा. लि. च्या (डीआरपीपीएल) प्रवक्त्यांनी सांगितलं.
पात्र निवासी सदनिका म्हणजे १ जानेवारी, २००० च्या आधी अस्तित्वात असलेल्या सदनिका आहेत. प्रत्येक फ्लॅटमध्ये स्वतंत्र स्वयंपाकघर आणि स्वतंत्र शौचालय असेल आणि हे फ्लॅट्स सुरक्षित असण्यासोबतच त्यात चांगला उजेड असेल. ते हवेशीर आणि आरोग्यदायी असतील.
धारावीची चैतन्यमय आणि वेगळी उद्योजकीय संस्कृती अबाधित ठेवून धारावीचा व्यावसायिक आणि औद्योगिक परिसर म्हणून विकास करण्याचा आणि जागतिक स्तरावर जोडलेले शहर बनवण्याचा डीआरपीपीएलचा प्रयत्न आहे. धारावीकरांचं जीवनमान उंचावणं, आर्थिक संधी, भविष्य घडवणारं शिक्षण तसंच व्यावसायिक प्रशिक्षण, आधुनिक आरोग्य सुविधा आणि दर्जेदार जीवनशैली हे धारावी आणि नवी धारावी इथे उपलब्ध असेल. त्यांच्यासाठी सामाजिक सभागृहं, मनोरंजन क्षेत्र, सार्वजनिक उद्यानं, दवाखाने आणि मुलांसाठी संगोपन केंद्रेदेखील असतील.
डीआरपीपीएलने धारावीचा कायापालट करण्याचं आव्हान स्वीकारलं असून या बहुप्रतिक्षित परिवर्तन प्रकल्पासाठी सर्व हिस्सेधारकांकडून मिळणारा पाठिंबा आमच्यासाठी बहुमूल्य आहे. त्यातून सिंगापूर आणि इतर प्रगत राष्ट्रांमध्ये अशा योजनांसाठी ज्या प्रक्रिया पाळल्या जातात त्यांचे सर्वोत्तम पद्धतीने असं पालन करण्यात येईल की, उर्वरित जगासाठी झोपडपट्टी पुनर्वसन आणि शहरी पुनरुज्जीवनाचे नवं मानदंड निश्चित होतील.
डीआरपीपीएल विषयी
धारावी पुनर्विकास प्रकल्प प्रायव्हेट लिमिटेड (डीआरपीपीएल) ही अदानी समूह आणि महाराष्ट्र सरकार यांच्यातील संयुक्त उपक्रम म्हणून स्थापन केलेली एक विशेष उद्देश कंपनी आहे. धारावीकरांना आधुनिक घरं उपलब्ध करून देऊन आणि त्यांच्या अंगभूत उद्योजकतेची भावना जपतानाच त्यांच्या जीवनात परिवर्तन आणि सुधारणा करण्याचं डीआरपीपीएलचे उद्दिष्ट आहे.
मनुष्य केंद्रीभूत ठेवून केलं जाणारं हे परिवर्तन मोकळ्या जागेची पुनर्बांधणी आणि नव्या वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असलेलं सामुदायिक राहणीमान, वाहतूक सुविधा, वीज, पाणी आणि इंटरनेट या अत्याधुनिक अत्यावश्यक बाबींवर आधारित आहे आणि स्वच्छ वातावरण असलेल्या तेथील परिपूर्ण नागरी सुविधा दर्जाचा मानदंड उभा करतील.