Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

एकाच्या बाईकमध्ये मांजा अडकला, दुसऱ्या युवकाचा मदतीचा प्रयत्न आला अंगलट, पाय देताच…

9

अहमदनगर : मंकरसंक्रातीनिमित्त पतंग उडविताना काळजी घेण्याचे कितीही आवाहन केले, तरी रस्त्यावर तुटून पडलेल्या मांजामुळे दरवर्षीच अपघात होतात. बंदी असलेला चीनी आणि नायलॉन मांजाही वापरला जातो. हा मांजा दुचाकीस्वारांसाठी जीवघेणा ठरत आहे. अहमदनगर शहरात असाच एक विचित्र अपघात झाला.

रस्त्याने सहकुटुंब जाणाऱ्या एका दुचाकीस्वाराच्या दुचाकीच्या चाकात मांजा अडकला होता. चौकात उभ्या असलेल्या दुसऱ्या युवकाच्या ते लक्षात आले. त्याने आवाज देऊन दुचाकीस्वाराला थांबविण्याचा प्रयत्न केला, मात्र तो थांबला नाही. पुढे जाऊन त्याला अपघात होऊ नये म्हणून चौकात उभ्या युवकाने त्या मांजावर पाय दिला. मात्र, यामुळे त्यालाच गंभीर दुखापत झाली. मोठी शस्त्रक्रिया करण्याची वेळ आल्याने थेट पुण्याला हलविण्यात आले.

अहमदनगर शहरातील माळीवाडा भागात रविवारी सायंकाळी ही घटना घडली. मयूर दत्तात्रेय शिंदे (वय ३०, रा. माळीवाडा) हा माळीवाडा चौकात उभा होता. त्यावेळी तेथून एक कुटुंब दुचाकीवरून जात होते. त्यांच्या दुचाकीच्या चाकात मांजा अडकला होता. तो गाडीसोबत ओढला जाऊन चाकात गुंडळला जात होता. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता लक्षात घेऊन शिंदे याने त्या दुचाकीस्वाराला आवाज देत थांबण्याची सूचना केली. मात्र, त्या दुचाकीस्वाराने काहीही प्रतिसाद न देता गाडी तशीच पुढे नेली.

12th Fail फेम दिग्दर्शक विधू विनोद चोप्रांच्या लेकाची चमकदार कामगिरी, रणजी पदार्पणातच २५८ धावा
समसूचकता म्हणून मयूर शिंदे यांनी त्या दुचाकीमागे ओढत चाललेल्या मांजावर पाय दिला. जेणे करून तो तुटून पडावा व त्या कुटुबांच्या दुचाकीला अपघात होऊ नये, असा त्याचा प्रयत्न होता. मात्र दुचाकी दूर गेली तरी मांजा न तुटता ओढला जात होता. काही वेळात मांजाचा विखळा मयूरच्या पायाला पडला. त्यातच मांजा ओढला जात होता. त्यामुळे काही क्षणातच मयूरचा पाय कापला गेला.

नमो महिला सशक्तीकरण कार्यक्रमासाठी नारी शक्तीची पायपीट, उन्हाचा त्रास, जेवणाचीही गैरसोय
गंभीर जखमी झाल्याने तो विव्हळत असल्याचे चौकातील इतरांनी पाहिले. ते त्याच्या मदतीला धावून आले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपशहराध्यक्ष सागर विधातेही मदतीला आले. त्यांनी मयूर शिंदेच्या पायात अडकलेला मांजा काढला. त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार करण्यात आले. मात्र, जखमी मोठी असल्याने अवघड शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याने त्याला पुण्याला नेण्यात येत आहे. आम्ही अनेकदा मागणी करूनही पोलिस आणि प्रशासनाने चीनी तसेच नायलॉन मांजावर कारवाई करण्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप विधाते यांनी केला.

कळा येण्याचे इंजेक्शन घेऊन २२ जानेवारीला डिलीव्हरी हवी, ‘श्रीराम मुहूर्ता’च्या आग्रहावर प्रसूतितज्ज्ञ म्हणतात…

पोलिसांची मांजाविरूद्ध कारवाई सुरू

दरम्यान, न्यायालयाकडूनही दणका बसल्याने पोलिसांनी नायलॉन मांजाविरूद्ध करावाई सुरू केली आहे. दुकानांवर कारवाई सुरू झाल्याने काही जणांनी घरातून अशा धोकादायक मांजाची विक्री सुरू केल्याचे आढळून आले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नगर शहर व श्रीरामपूरमध्ये कारवाई केली. या कारवाईत २६ हजार रुपयांचे नायलॉन मांजाचे २७ बंडल पोलिसांनी जप्त केले आहेत. नगर शहर व श्रीरामपूरमध्ये दोघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून मोनो काईट, मोनो फायटर, हिरो प्लस असे वेगवेगळ्या नायलॉन मांजा जप्त करण्यात आला. दर्शन दिनेश परदेशी (वय २५, रा. सातभाईमळा, दिल्ली गेट, अहमदनगर) व सुजित ऊर्फ सनि शंकर नागरे (वय ३१, रा. बाजार रोड, नांगरे बिल्डींग, ता. श्रीरामपूर) यांच्याविरूद्ध ही कारवाई करण्यात आली.

सॉफ्टवेअर डेव्हलपर इंजिनिअरची कलाकारी, अवघ्या २०० रुपयांत बनवली १० फुटांची ‘बाहुबली पतंग

Read Latest Maharashtra Updates And Marathi News

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.