Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

नगरसेवक खुनी हल्ला प्रकरणी आणखी ५ आरोपींना गोंदिया पोलिसांनी केली अटक,वापरलेली बंदुकही केली हस्तगत…

8

माजी नगरसेवक लोकेश ऊर्फ कल्लु यादव” यांचेवरील गोळीबार प्रकरण

गुन्ह्यात आणखी 5 आरोपींना अटक आतापर्यंत एकूण 9 आरोपी अटकेत,आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेला देशी कट्टा (मावझर/अग्निशस्त्र), तीन राउंड व दोन मोटर सायकली, 4 मोबाईल हस्तगत…
गोंदिया(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक 11 जानेवारी 2024 रोजी चे साधारण 11.00 वा . ते 11.30 वा. दरम्यान सावलानी किराना दुकानाचे समोर हेमु कॉलोनी, यादव चौक गोंदिया येथे दोन अज्ञात आरोपींनी माजी नगरसेवक जखमी  लोकेश ऊर्फ कल्लु सुंदरलाल यादव वय 42 वर्ष रा. यादव चौक गोंदिया यांचेवर कोणत्यातरी बंदुकीने गोळी मारुन गंभीर जखमी करुन जिवानिशी ठार करण्याचा प्रयत्न केल्याने फिर्यादी लक्की छगनलाल यादव वय 20 वर्ष रा. बाराखोली सिंधी कॉलोनी गोंदिया याचे रिपोर्ट वरून पो. स्टे. गोंदिया शहर अप.क्र. 11/2024 कलम 307, 34 भादवि. सह कलम 3, 25 भा.ह. का. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता…… सदर गुन्ह्यातील अज्ञात आरोपी हे गोळीबाराची घटना करून पसार झाले होते

सदर घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक, गोंदिया निखिल पिंगळे, अप्पर पोलिस अधीक्षक, नित्यानंद झा,उपविभागीय पोलिस अधिकारी  प्रमोद मडामे, यांचे मार्गदर्शनाखाली आरोपींचे शोध व जेरबंद करण्याकरीता गोंदिया शहर पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी, अंमलदार यांची वेगवेगळी पथके नेमण्यात आली होती पोलिस पथकाने अत्यंत तत्परतेने, परिश्रम घेवून गुन्ह्यातील अज्ञात आरोपीयांचा शोध घेऊन दिनांक 13 जानेवारी 2024 रोजी आरोपी क्र
1) गणेश शिवकुमार शर्मा वय 21 वर्ष रा. भिंडी ले आउट वरोडा ता. कळमेश्वर जिल्हा नागपुर

2) अक्षय मधुकर मानकर वय 28 वर्ष रा. सम्राट ग्राउंड शिक्षक कॉलोनी कळमेश्वर जिल्हा नागपुर

3) धनराज ऊर्फ रिंकु व राजेंद्र राउत वय 32 वर्ष रा. कुंभारेनगर गोंदिया

4) नागसेन बोधी मंतो वय 41 वर्षे रा. गौतम बुध्द वार्ड, श्रीनगर गोंदिया
यांना गुन्ह्यांत अटक करण्यात आलेली होती गुन्हयाचे तपासाचे अनुषंगाने नमूद आरोपी यांचा मा. न्यायालयाकडून 10 दिवसाचा पोलिस कोठडी रिमांड घेण्यात आला आरोपीतांना नमूद गुन्ह्यात विचारपूस, चौकशी तपासा दरम्यान अटकेत असलेले आरोपी यांनी सांगितलेल्या माहिती वरुन गुन्ह्यांत आणखी 5 आरोपी नामे
5) शुभम विजय हुमणे, वय 27 वर्षे, रा. भीमनगर, गोंदिया

6) सुमित ऊर्फ पंछी विकास डोंगरे, वय 23 वर्षे, रा. कुंभारे नगर, गोंदिया

7) रोहीत प्रेमलाल मेश्राम वय 32 वर्षे, रा. कुंभारे नगर, गोंदिया

8) नितेश ऊर्फ मोनु लखनलाल कोडापे, वय 28 वर्षे, रा. विहीरगांव, तिरोडा ह.मु. कुंभारे नगर, गोंदिया

9) मयुर ऊर्फ सानु विजय रंगारी, वय 27 वर्षे, रा. सिंगलटोली, आंबेडकर वार्ड, गोंदिया

यांना ताब्यात घेवून दिनांक 13 व 14 तारखेला विचारपूसअंती गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे

गुन्ह्यातील अटक आरोपी रोहीत मेश्राम याचेकडुन गुन्हयात वापरलेली 01 नग पिस्टल व 03 नग जिवंत काडतुस व इतर अटक आरोपीतां कडुन गुन्हयात वापरलेल्या एकुण 02 नग मोटार सायकल व एकुण 04 नग मोबाईल फोन असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे

सदर गुन्ह्यात तपासा दरम्यान सहभागी 01 ते 09 आरोपींना ताब्यात घेवून अटक करण्यात आलेली आहे सर्व आरोपी हे दिनांक 22/01/2024 पर्यंत पोलिस कोठडी रिमांड मध्ये आहेत गुन्ह्याचे अनुषंगाने अधिकचा तपास सुरु असुन गुन्ह्यातील मुख्य पाहीजे असलेला आरोपी प्रशांत मेश्राम याचा पोलिस पथकाद्वारे कसुन शोध घेण्यात येत आहे

गोंदिया जिल्हा पोलिस दल, गोंदिया शहर, व स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांतर्फे आतापर्यंत च्या केलेल्या एकंदरीत तपास व आरोपींना केलेल्या विचारपुस, चौकशीवरुन असे दिसून येत आहे की, यातील आरोपी व जखमी यांचेत आपसात जुन्या देवाण घेवाणच्या निर्माण झालेल्या वैमनस्य-वितुस्ठ कारणावरून सदरचा जीवघेणा गोळीबार झाल्याचे सद्यास्थितीत दिसून येत आहे गुन्ह्याचे पुढील सखोल तपासात गुन्ह्याचा उलगडा सविस्तर माहिती निष्पन्न होवू शकते

सदर गुन्ह्याचा तपास वरिष्ठांचे मार्गदर्शनात स.पो.नि. विजय गराड, पो. स्टे. गोंदिया शहर हे करीत आहेत
वरीष्ठांचे मार्गदर्शनाखाली नमूद गुन्ह्यातील आरोपींना तात्काळ गुन्ह्यांची उकल करून जेरबंद करण्याची कामगीरी पोलिस निरीक्षक दिनेश लबडे, पोलिस निरीक्षक,चंद्रकांत सुर्यवंशी यांचे नेतृत्वातील स्थानिक गुन्हे शाखेच्या तसेच गोंदिया शहर येथील पोलिस अधिकारी- अंमलदार यांचे पथकाने अत्यंत संयमाने आणि तत्परतेने परिश्रम घेवून कामगीरी केलेली आहे. .

Leave A Reply

Your email address will not be published.