Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आतापर्यंतचा सर्वात शक्तिशाली Xiaomi स्मार्टफोन येतोय भारतात; आयफोनची करणार का सुट्टी?

13

शाओमीच्या १४ सीरीजचा टॉप मॉडेल Xiaomi 14 Ultra काही दिवसांत भारतीय बाजारात एंट्री करू शकतो. कारण हा डिव्हाइस ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड सर्टिफिकेशन वेबसाइटवर स्पॉट झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, येत्या एप्रिलमध्ये हा होम मार्केट चीनमध्ये लाँच केला जाऊ शकतो त्यानंतर भारतात देखील लाँच केला जाऊ शकतो. विशेष म्हणजे हा कंपनीचा आतापर्यंतचा सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन असेल. चला, जाणून घेऊया लिस्टिंगची माहिती.

Xiaomi 14 Ultra बीआयएस लिस्टिंग

Xiaomi 14 Ultra स्मार्टफोन BIS सर्टिफिकेशन वेबसाइटवर 24030PN60G मॉडेल नंबरसह लिस्ट करण्यात आला आहे. या मॉडेल नंबरसह फोन याआधी EEC आणि IMEI डेटाबेसवर देखील दिसला होता. ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड सर्टिफिकेशन प्लॅटफॉर्मवर फोनच्या इतर स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळाली नाही परंतु हिंट मिळाली आहे की Xiaomi 14 Ultra भारतात येऊ शकतो.

50-100 नव्हे 200 मेगापिक्सलच्या कॅमेऱ्यासह आले Redmi चे दोन फोन; 12जीबी RAM सह मिळतोय जबरदस्त प्रोसेसर

Xiaomi 14 Ultra चे स्पेसिफिकेशन्स

शाओमीच्या या दमदार फोनमध्ये ६.७ इंचाचा क्वॉड कर्व अ‍ॅमोलेड डिस्प्ले दिला जाऊ शकतो. यात K रिजॉल्यूशन आणि शानदार १४४हर्ट्झ रिफ्रेश रेट मिळू शकतो. Xiaomi 14 Ultra मध्ये क्वॉलकॉमचा आता पर्यंतचा सर्वात पावरफुल स्नॅपड्रॅगन ८ जेन ३ चिपसेट दिला जाऊ शकतो. डिव्हाइसमध्ये १६जीबी पर्यंत रॅम आणि १टीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज मिळण्याची शक्यता आहे. Xiaomi 14 Ultra लेटेस्ट अँड्रॉइड १४ आधारित नवीन हायपरओएसवर चालू शकतो.

हा डिव्हाइस क्वॉड कॅमेरा सेटअपसह येऊ शकतो. ज्यात ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायजेशन सपोर्टसह ५० मेगापिक्सलचा प्रायमरी, ५० मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड, ५० मेगापिक्सलचा टेलीफोटो आणि ५०एमपी सोनी एलव्हायटी९०० लेन्सचा वापर केला जाऊ शकतो. तसेच, सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी डिव्हाइसमध्ये ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो.

Xiaomi 14 Ultra मध्ये फोन ५०००एमएएचची बॅटरी आणि १२०वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट, ५०वॉट वायरलेस चार्जिंग टेक्नॉलॉजी दिली जाऊ शकते. हा डिव्हाइस धूळ आणि पाण्यापासून बचाव करण्यासाठी आयपी६८ रेटिंग, इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, ड्युअल सिम ५जी, ब्लूटूथ, वायफाय सारखे अनेक फीचर्स मिळू शकतात.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.