Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

मोदींची चलाखी अन् संपूर्ण भारतात प्रभूरामासाठी थाळीनाद; अभिनेत्याचा दावा, पण सत्य काय?

11

पुणे: करोना संकट काळात पंतप्रधान मोदींनी भारतीयांना एकजूट दाखवण्याचं आवाहन केलं होतं. करोना काळात आघाडीवर लढत असलेल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी थाळ्या वाजवण्याचं आवाहन केलं होतं. मात्र यावेळी देशात आणखी एक घडामोड सुरू होती, असा दावा अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी पुण्यातील भाषणात केला. संपूर्ण देशभरात थाळीनाद, घंटानाद सुरू असताना योगी आदित्यनाथ रामलल्लाची मूर्ती घेऊन अस्थायी मंदिराकडे जात होते. पंतप्रधान मोदींनीच ही शक्कल लढवली होती, असा दावा सोलापूरकरांनी केला.

सोलापूरकर काय म्हणाले? भाषण वाचा जसंच्या तसं…
”२०१९ मध्ये निर्णय झाला.. लागलीच राम मंदिराचं बांधकाम सुरू करायचा निर्णय राम मंदिर न्यासानं घेतला.. पण त्यासाठी तिथे असलेली रामाची मूर्ती अस्थायी मंदिरात नेणं आवश्यक होतं. पण त्यासाठी मुहूर्त शोधला गेला आणि नेमका त्याच वेळी दुर्दैवानं संपूर्ण जगाला करोनानं गाठलं. जग बंद पडलं. भारतात या रोगाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी भारतही बंद होणं भाग होतं.”

”आपल्याला आठवत असेल एक दिवसाचा पहिला प्रातिनिधीक बंद, २३ मार्च २०२० रोजी पंतप्रधानांनी आवाहन केलं आणि लगेचच संध्याकाळी सांगितलं उद्यापासून भारत कायमचा बंद होतोय. किमान पुढचे ३ महिने तरी. त्यानंतर २५ मार्च २०२०. हिंदूंचा सगळ्यात मोठा सण होता गुढीपाडवा. पंतप्रधानांनी आवाहन केलं, करोनाच्या विरोधात संपूर्ण भारत एक होतोय हे दिसावं यासाठी उद्या सकाळी साडे आठ ते साडे नऊ एक तास घरातील देवघरात एक उत्तम दिवा लावा आणि आपली खिडकी असेल, गॅलरी असेल, गच्ची असेल, आपल्या घरासमोर अंगण असेल, जिथे शक्य होईल तिथे येऊन घंटा, झांजा, थाळ्या, जे शक्य असेल ते वाजवा.”

”ज्यांचा देवधर्मावर विश्वास नाही, अशा लोकांनीदेखील घंटा, थाळ्या वाजवलेल्या आपण लोकांनी पाहिल्या. पण आपल्यापैकी कोणालाच माहीत नसलेली गोष्ट आता सांगतो. अस्थायी मंदिरात रामलल्ला नेण्याचा मुहूर्त दुर्दैवानं तो होता त्यावेळेला. कारण करोना काळ होता. मग अशा वेळी करायचं काय? योगी आदित्यनाथांनी पंतप्रधानांना विचारलं, रामलल्ला असा सुकासुका कसा जाणार? अयोध्यावासींसह त्याची मोठी मिरवणूक अस्थायी मंदिरापर्यंत गेली पाहिजे. पण आता गर्दी करायला परवानगी नाही. सगळा भारत बंद केलाय. आम्ही करायचं काय? पंतप्रधान म्हणाले, तु्म्ही काळजी करू नका. मी बघतो काय करायचं ते.”

”सकाळी फक्त तीन सिक्युरिटी गार्ड, पाच महंत, ज्यांना पुजेचे अधिकार आहेत असे, त्यांना सोबत घेऊन योगी आदित्यनाथांनी स्वत:च्या डोक्यावर, पाटावर रामलल्लाची मूर्ती घेतली आणि १.३ किलोमीटर असं चालत अस्थायी मंदिरात ठेवली आणि त्यावेळी संपूर्ण भारत थाळ्या, घंटा, झांजा वाजवत होता. त्यानंतर पंतप्रधानांनी योगी आदित्यनाथ आणि चंपत राय यांना फोन करुन विचारलं, एवढा मोठा जयघोष अयोध्येत झाला असता का? अख्खा भारत रामलल्लासाठी वाजवत होता. याच्यापेक्षा अजून वेगळं काय असावं आणि त्यानंतर सुरु झालेलं मंदिर निर्माण. या २२ जानेवारीला ते स्वप्न पूर्ण होतंय.”

सत्य काय?
अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी सांगितलेला घटनाक्रम पूर्णत: चुकीचा आहे.
पंतप्रधान मोदींनी २५ मार्चला नव्हे, तर २२ मार्चला थाळी वाजवण्याचं आवाहन केलं होतं. त्या दिवशी गुढीपाडवा नव्हता.
सकाळी साडे आठ ते साडे नऊ असा तासभर घंटानाद, थाळीनाद करा, असं आवाहन मोदींनी केलेलं नव्हतं. संध्याकाळी ५ वाजता केवळ ५ मिनिटं थाळी वाजवण्याचं आवाहन मोदींकडून देशाला करण्यात आलं होतं.
मोदींनी केलेल्या आवाहनाला योगी आदित्यनाथांनी प्रतिसाद दिला. त्यावेळी ते गोरखपूरमध्ये होते. अयोध्येत नव्हते.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.