Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

अखेर पदोन्नतीचा निर्णय झालाच,त्या ७० सहाय्यक पोलिस निरीक्षकांना मिळणार पदोन्नती-होणार पोलिस निरीक्षक…

9

१०३ तुकडीच्या सहाय्यक पोलिस निरीक्षकांचा पोलिस निरीक्षक म्हनुन पदोन्नती चा मार्ग मोकळा,महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरण(MAT) ने  दिला निर्वाळा….

मुंबई(प्रतिनिधी) मागील दोन वर्षांपासून पोलिस निरीक्षक पदावर
पदोन्नतीसाठी  वाट बघत असलेल्या सहायक पोलिस निरीक्षकांमधे आनंदाची लहर तयार झालीये त्याला कारणही तसच आहे म्हनावं  . सहायक पोलिस निरीक्षकांच्या पदोन्नतीचा मार्ग आता मोकळा झाला.आहे कारण महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरण(MAT)’ने चार आठवड्यांच्या आत  पदोन्नती देण्याचे आदेश दिले. ‘MAT च्या आदेशाने राज्यातील पोलिस अधिकाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पोलिस अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीबाबत महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) ने घेतलेल्या परीक्षेत उत्तीर्ण १०२ आणि १०३ तुकडीचे सहायक पोलिस अधिकारी गेल्या दोन वर्षांपासून पदोन्नती मिळण्यासाठी पात्र आहेत. मात्र, कनिष्ठ तुकडीतील काही अधिकाऱ्यांनी मॅटमध्ये धाव घेतल्यामुळे दोन्ही तुकडीतील पोलिस
अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीस अडथडा निर्माण झाला होता

कनिष्ठ आणि वरिष्ठ तुकडीने MAT मधे प्रकरण दाखल केले होते.म्हनुन  न्यायाधीन प्रकरणामुळे पोलिस महासंचालक कार्यालयाने पदोन्नती देण्यास विलंब केला होता. म्हनुन की काय      पदोन्नतीस पात्र असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलिस महासंचालकांची भेट घेतली. तरीसुध्दा
पदोन्नतीतील तिढा सुटत नव्हता. पदोन्नती देण्यासाठी पोलिस महासंचालक कार्यालय सकारात्मक होते तर संबंधीत प्रकरण हे न्यायप्रविष्ट असल्यामुळे यावर निर्णय घेता येत नव्हता.

परंतु १०२ तुकडीतील जवळपास अर्धेअधिक अधिकारी पोलिस निरीक्षक पदावर रुजू आहेत तर उर्वरित ७० अधिकारी अजूनही सहायक पोलिस निरीक्षक म्हनुन त्यांच्यात तुकडीतील परंतु पोलिस निरीक्षक झालेल्या सहकारी/अधिकारी यांचे हाताखाली काम करीत आहेत.

तसेच १०३ तुकडीतील ५३० अधिकारी पदोन्नती मिळेल या
आशेवर अजुनही वाटच पाहत होते पदोन्नती साठी पात्र असतानाही दोन वर्ष सहायक पोलिस निरीक्षक पदावर काम करावे लागत असल्यामुळे अधिकाऱ्यांमध्ये कमालीची नाराजी व अस्वस्थता पसरली होती यानिराशेनेच ते पोलिस महासंचालक आणि गृहमंत्रालयात चकरा मारून पोलिस अधिकाऱी सुध्दा त्रस्त झाले होते . मात्र, आता मॅटने चार आठवड्यात पोलिस निरीक्षक पदावर
पदोन्नती देण्याचा निर्णय दिला. त्यामुळे राज्यभरातील पोलिस अधिकाऱ्यांचा पदोन्नतीचा मार्ग मोकळा झाला. आहे

या आनंदाच्या भरात ते एकमेकांना शुभेच्छाही देताय परंतु हा त्यांचा आनंद क्षणिक ठरु नये हीच अपेक्षा व भितीही आहे की  या निर्णयावर विरजन पडु नये

एका पोलिस अधिकाऱ्यास याबाबत शुभेच्छा देत प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले की आम्ही या निर्णयाने फार आनंदी आहोत परंतु आमची ही मागणी आता नियमानुसार मान्य करावी अन्यथा या संबंधीत अधिकारी काय टोकाची भुमीका घेतील सांगता येत नाही

 

Leave A Reply

Your email address will not be published.