Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
चारचाकी वाहनाने अवैधरित्या पुलगाव शहरात येणारा देशी, विदेशी,गावठी मोहा दारुचा साठा स्थागुशा पथकाने नाकाबंदी करुन पकडला…
पुलगाव(वर्धा) प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांनी अवैध धंद्याचे समुळ उच्चाटन करण्यासाठी पोलिस निरीक्षक स्थागुशा यांना व सर्व प्रभारी यांना आदेशीत केले होते त्याअनुषंगाने दिनांक 15/01/2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखा वर्धा व अँटी गँग सेल पथक पोलिस स्टेशन पुलगाव परीसरात गुन्हेगार चेक व अवैद्य धंदयावर कार्यवाही करणे कामी पेट्रोलींग करीत असतांना मुखबिरकडुन मिळालेल्या गोपणीय माहितीवरून सिंदी कॉलनी पुलगाव येथे राहणारा दिनेश माटा हा त्याचे साथीदारासह त्याचे ताब्यातील पांढऱ्या रंगाची इकोस्पोर्ट गाडी क्रमांक एम एच 40 एम 0413 ने कंळब जिल्हा यवतमाळ येथून विजयगोपाल मार्गाने त्याचे राहते घरी पुलगाव येथे देशी विदेशी व गावठी मोहा दारूसाठा घेवून येत आहे अश्या माहिती वरून त्यांचेवर घेराव टाकुन छापा टाकला असता आरोपी
1) दिनेश नारायणदास माटा, वय ३७ वर्ष, रा. सिंदी कॉलनी, पुलगांव जिल्हा वर्धा,
त्याचा साथीदार
2) फिरोज अजीजखा पठाण, वय 27 वर्षे, रा. नागपूरफैल पुलगाव, जि. वर्धा
याचे ताब्यातुन
1) एका खर्ड्याच्या खोक्यात ॲाफीसर चॉईस ब्लू कंपनीच्या विदेशी दारूने भरलेल्या 180 एम.एल.च्या 58 सिलबंद बाटल्या ज्याचा बॅच नं 404/23 दिनांक 25/12/23 प्रतीनग 300 रु. प्रमाणे 17,400/रु
2) दोन एका खर्डाच्या खोक्यात RS कंपनीच्या विदेशी दारूने भरलेल्या 180 एम.एल च्या 96 सिलबंद बाटल्या ज्याचा बॅच नं 2801 दिनाक 01/12/23 प्रतीनग 350 रु. प्रमाणे 33600/- रु
३) चार खर्डाच्या खोक्यात सिमला कंपनीच्या देशी दारूने भरलेल्या 180 एमएल च्या 192 सिलबंद बाटल्या ज्याचा बैंच न. 359 नोव्हेंबर 23 प्रती नग 150 रु. प्रगापणे 26,800/-रु.
4) एका खर्डाच्या खोक्यात सिमला कंपनीच्या देशी दारूने भरलेल्या 90 एम एल च्या 100 सिलबंद बाटल्या ज्याचा बॅच नं. 429 डिसेंबर 23 प्रतीनग 100 रु प्रमाणे 10,000/- रु.
5)06 सहा मोठया प्लास्टीक कॅनमधे 180 लिटर गावठी मोहा दास प्रती 150 रु. प्रमाणे किमत 27,000/ रु.
6) 06 मोठया प्लॉस्टीक कॅन प्रती 500 रु प्रमाणे किं 3000/-रु
7) एक पांढऱ्या रंगाची इकोस्पोर्ट गाडी क्रमांक एमएच 40 एम 0413 चारकाची गाडी किमत 7,00,000/- रू
8) एक जुनी वापरती निळ्या रंगाची टी व्ही एस कंपनीची ज्युपीटर मोपेड ज्याचा क्रमांक एम.एच 32 ए.टी. 7703 किं 1,00,000/- रु.
9) एक आकाशी रंगाचा टेक्नो स्पार्क कंपनीचा मोबाईल किंमत 10,000/- रु.असा एकुण जु.कि. 9.29,800/- चा मुद्देमाल जप्त करून आरोपी क्रं 01 याला जप्त दारुबाबत विचारणा केली असता त्याने
३) बार मालक मनिष जयस्वाल रा. कळंब जिल्हा यवमाळ (फरार) याचे बार मधुन विकत आणल्याची माहिती दिली. सदर तिन्ही आरोपीतांविरुध्द पोलिस स्टेशन पुलगाव येथे कलम 65 (अ) (ई), 77 (अ),83 म.दा.का. सहकलम 3 (1)/181, 130/177 मोवाका गुन्हा नोद करून तपासात घेतला.
सदर कारवाई नूरुल हसन,पोलिस अधिक्षक, डॅा सागर कवडे अपर पोलिस अधिक्षक, पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनात पो उप नि अमोल लगड, पो.हवा. गजानन लामसे, अरविंद येनुरकर, भुषण निघोट, महादेव सानप, रितेश शर्मा, पोलिस अंमलदार गोपाल बावनकर, मंगेश आदे सर्व स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली.