Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

ganeshotsav: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी ‘हा’ मोठा दिलासा

15

हायलाइट्स:

  • गणेशोत्सवासाठी मुंबईतून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मिळाला दिलासा.
  • कोकणात गणेशोत्सवासाठी जाताना चाकरमान्यांसाठी आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक नाही.
  • मात्र, करोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करणे आवश्यक.

रत्नागिरी: कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. ती म्हणजे आता गणेशोत्सवासाठी जाताना चाकरमान्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्याची गरज असणार नाही. रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आमदार भास्कर जाधव यांनी दिली आहे. (rtpcr test is no longer mandatory for people going to konkan for ganeshotsav)

ज्या प्रवाशांनी लशीचे दोन डोस घेतलेले नसतील अशा प्रवाशांची जिल्ह्यात प्रवेश करताना आरटीपीसीआर चाचणी करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला होता. तसेच ज्या व्यक्तींना करोनाचा संसर्ग झाल्याचे आढळल्यास त्यांना संस्थात्मक विलगीकरणात राहणेही बंधनकारक करण्यात आले होते. इतकेच नाही तर रत्नागिरी जिल्ह्यात प्रवेश करण्यापूर्वी ७२ तास आधी आरटीपीसीआर चाचणी केल्याचे प्रमाणपत्र देखील बंधनकारक करण्यात आले होते.

क्लिक करा आणि वाचा- नाव न घेता धनंजय मुंडे यांच्यावर भाजपच्या माजी मंत्र्यांचा ‘हा’ गंभीर आरोप

चार दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांची लगबग सुरू झाली असून जिल्हा प्रशासनाच्या या निर्णयामुळे या चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्हा प्रशासनाला दिलेल्या सूचनांबाबत माहिती देताना भास्कर जाधव म्हणाले, ‘कोकणामध्ये येताना रस्त्यामध्ये कुठल्याही ठिकाणी थांबून त्यांचे आरटीपीसीआर चाचणी किंवा अँटीजन चाचणी केली जाणार नाही. तसेच त्यांची कोणत्याही प्रकारची अडवणूक किंवा पिळवणूक केली जाणार नाही, अशी स्पष्ट चर्चा स्थानिक जिल्हा प्रशासनाकडे आपण केल्याची माहिती भास्कर जाधव यांनी केली आहे.’

क्लिक करा आणि वाचा- धनंजय मुंडेंविरोधात पुरावे द्यायला आलेल्या करुणा शर्मांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

दरम्यान, राज्यावरील करोनाचे संकट टळलेले नसून कोकणात गणेशोत्सवासाठी जात असताना मास्कचा वापर करणे, गर्दी न करणे, सामाजिक अंतर टाळणे, हात वारंवार धुणे अशा करोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोरपणे पालन करणे मात्र अत्यंत आवश्यक आहे.

क्लिक करा आणि वाचा- चिपी विमानतळावर कागदाचं विमान उडवणार का?; नितेश राणेंचे टीकास्त्र

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.