Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
हायलाइट्स:
- गेल्या २४ तासांत राज्यात ३ हजार ६२६ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.
- गेल्या २४ तासांमध्ये एकूण ५ हजार ९८८ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
- आज राज्यात एकूण ३७ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
मुंबई: राज्यात कालच्या तुलनेत आज करोना (coronavirus) बाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत मोठी घट झाल्याने राज्याला मोठा दिलासा मिळाल्याचे चित्र आहे. विशेषत: दैनंदिन मृत्यू देखील बऱ्यापैकी घटले आहेत. तसेच बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत देखील किंचित वाढ झाली आहे. तसेच कालच्या तुलनेत एकूण सक्रिय रुग्णांची संख्याही घटली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज दिवसभरात राज्यात ३ हजार ६२६ इतक्या नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. काल ही संख्या ४ हजार ०५७ इतकी होती. तर आज दिवसभरात एकूण ५ हजार ९८८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. काल ही संख्या ५ हजार ९१६ इतकी होती. तर, आज ३७ रुग्णांचा मृत्यू झाला. काल ही संख्या ६७ इतकी होती. (maharashtra registered 3626 new cases in a day with 5988 patients recovered and 37 deaths today)
आज राज्यात झालेल्या ३७ रुग्णांच्या मृत्यूंनंतर राज्याच्या मृत्यूदर २.१२ टक्क्यांवर स्थिर आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ६३ लाख ७५५ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०९ टक्के इतके झाले आहे.
क्लिक करा आणि वाचा- हृदयद्रावक! पोळा सणासाठी धरणात बैलांना धुण्यासाठी गेला आणि गमावला जीव
राज्यातील सक्रिय रुग्णसंख्या घटली
राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ४७ हजार ६९५ वर आली आहे. या बरोबरच राज्यातील सक्रिय रुग्णांचा जिल्हानिहाय विचार करता पुणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. पुणे जिल्ह्यात हा आकडा १२ हजार ४१३ वर गेला आहे. ठाणे जिल्ह्यात मात्र ही संख्या वाढून ती ७ हजार २७५ वर आली आहे. त्या खालोखाल साताऱ्यात ही संख्या ६ हजार ३२८ इतकी खाली आली आहे. अहमदनगरमध्ये ही संख्या ४ हजार ९७५ वर घसरली आहे. तर, सांगलीत एकूण २ हजार ३४२ वर खाली आली आहे. तसेच, सोलापुरात ही संख्या २ हजार ६०९ वर खाली आली आहे.
क्लिक करा आणि वाचा- ‘बेळगाव झांकी आहे की नाही माहीत नाही, पण मुंबई बाकी आहे; ती सोडणार नाही’
मुंबईत उपचार घेत आहेत ४,२७३ रुग्ण
मुंबई महापालिका हद्दीत सक्रिय रुग्णांच्या संख्या ४ हजार २७३ इतकी वाढली आहे. तर, रत्नागिरीत १ हजार ०८१, सिंधुदुर्गात ८५७, नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ८३४ इतकी आहे.
भंडारा जिल्ह्यात फक्त एक सक्रिय रुग्ण
या बरोबरच, औरंगाबादमध्ये ४६८, नागपूर जिल्ह्यात ही संख्या ५३ वर खाली आली आहे. अमरावतीत ही संख्या ९० वर आली आहे. तर भंडारा जिल्ह्यात फक्त एक सक्रिय रुग्ण आहे. हीच राज्यातील सर्वात कमी रुग्णसंख्या आहे.
क्लिक करा आणि वाचा- गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी ‘हा’ मोठा दिलासा
३,०३,१६९ व्यक्ती होम क्वारंटाइन
आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी ४९ लाख ९९ हजार ४७५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४ लाख ८९ हजार ८०० (११.८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३ लाख ०३ हजार १६९ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, १ हजार ९६३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.