Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

अवैधरित्या वाळुची साठवणुक करुन विक्री करणारे पोलिस अधिक्षकांचे विशेष पथकाचे ताब्यात…

11

अवैधरीत्या रेतीची साठवणुक करून विक्री करणाऱ्याच्या पोलिस अधिक्षकांच्या विशेष पथकाने आवळल्या मुसक्या,१ कोटीच्यावर मुद्देमाल केला जप्त…

नागपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष पोद्दार यांनी नागपूर जिल्हयात अवैध धंदयावर कारवाई करून अवैध धंदयाचे समुळ उच्चाटन करणेबाबत आदेश दिले आहेत त्यांचे मार्गदर्शनाखाली  पोलिस अधिक्षक यांचे विशेष पथक हे अवैध धंदयावर कारवाई करीत असतांना दिनांक १६/०१/२०२४ चे सकाळी ०९.१५ वा. ते संध्या ७.१० वा. सुमारास गोपनीय सुत्रधारकांकडुन मिळालेल्या माहितीवरून पोलिस स्टेशन  मौदा येथील माथनी येथे नाकाबंदी करीत असता यातील आरोपींनी संगणमत करून, आरोपी मालकांचे सांगण्याप्रमाणे स्वतःचे आर्थीक फायद्या करीता शासनाची दिशाभूल करून एका रॉयल्टीवर ३ वाहने

१) १२ चक्का टिप्पर वाहन क्र. एम. एच. ४०/सि.टी. ७४७५,

२) १० चक्का टिप्पर वाहन क्र. एम. एच. ४०/ ए.टी. ७४७५,

३) १० चक्का टिप्पर वाहन क्र. एम. एच. ४०/ सि.एम. ७४७५

असे ३ वेगवेगळे वाहनांची सिरीज वेगवेगळी मात्र नंबर सारखेच चालवुन, रेती नांदेड येथुन लोड करून मौदा येथील रूट नसतांना माथनी मौदा नागपुर येथे आरोपीने आपले घरासमोर अनाधिकृतपणे साठवणुक करून, ईतर साथीदारांचे मदतीने JCB आणुन अवैध विक्री करीत असल्याचे आढळुन आलेले आहे. यातील

आरोपी क्र.

१) प्रकाश भय्याजी शिवणकर वय ३४ वर्ष, रा. वार्ड क्र. २ स्वराज्य नगर, मुंदढे लेआउट माथनी, तह. मौदा, जिल्हा नागपुर, चालक व
मालक (१) एम. एच. ४० सि.टी. ७४७५ आणि २) एम. एच. ४० ए.टी. ७४७५ या दोन्ही वाहनाचा मालक तसेच एम. एच. ४० ए. टी. ७४७५ चा चालक),

२) विशाल वसंता पुडके, वय २९ वर्ष (एम.एच. ४० / सि.टी. ७४७५ चा चालक),

३) विनोद जबदीश सैनी वय ३२ वर्ष, रा. हासपुर, पोस्ट श्रीमाधवपुर, तह. श्रीमाधवपुर, जिल्हा सिख्खर राजस्थान, ह.मु.लक्ष्मीकांत मोथरकर माथनी मौदा, जिल्हा नागपुर यांचे घरी किरायाने, (एम. एच.-४०/सि.एच.४७३८ चा मालक),

४) मिलींद कोकाटे, वय ३० वर्ष, रा. माथनी, तह मौदा, जिल्हा नागपुर, (एम.एच. ४०/ सि. एच.- ४७३८ चा ऑपरेटर) आरोपीतांविरूद्ध कलम ४२०, ३७९, १०९, ३४ भारतीय दंडविधान संहीता १८६०, सहकलम ४८(७), ४८(८) महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम १९६६, सहकलम ४, २१ खानी आणि खनीजे
(विकास आणि नियमन) अधिनियम १९५७, सहकलम ३, ४ सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतीबंधक अधिनियम १९८४ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपीतांकडुन

१) एक पांढऱ्या निळया रंगाचे टाटा कंपनीचे १२ चक्का टिप्पर एम. एच. ४० सि.टी. ७४७५ किंमत  ४५,००,००० / – रू.,

२) एक पांढऱ्या निळया रंगाचे टाटा कंपनीचे १२ चक्का टिप्पर एम. एच. ४० सि.टी. ७४७५ मध्ये ०४ ब्रास रेती प्रत्येकी ५०००/- रू. प्रमाणे किंमत २०,००० / – रू.,

३) एम. एच. ४० ए.टी. ७४७५ मध्ये ०५ ब्रास रेती किं २५,०००/- रू.

४) एक पिवळया रंगाची जेसीबी वाहन क्र. एम. एच- ४० / सि.एच-४७३८ किंमत ३०,००,०००/- रू.

५) विविध कंपनीचे मोबाईल व इतर साहित्य २५५१००० / – रू. असा एकुण १,००,९६,०००/-
रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कारवाई ही सदरची कारवाई ही पोलिस अधीक्षक नागपूर (ग्रामीण)  हर्ष पोद्दार, अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. संदीप पखाले  यांचे मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक अमित पांडे, पोहवा ललीत उईके, नापोशि प्रणय बनाफर, कार्तिक पुरी, बालाजी बारगुले, शुभम मोरोकार विशेष पथक नागपूर ग्रामीण यांनी पार पाडली.

Leave A Reply

Your email address will not be published.