Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
नवीन कलर व्हेरिएंटची किंमत
Motorola Razr 40 Ultra चा पीच फज कलर व्हेरिएंट भारतात अॅमेझॉन, कंपनीच्या वेबसाइट आणि प्रमुख रिटेल स्टोर्सच्या माध्यमातून ६९,९९९ रुपयांच्या स्पेशल लिमिटेड पीरियड किंमतीत विक्रीसाठी उपलब्ध होईल. फ्लिप-स्टाइल फोल्डेबल फोन इनफिनिट ब्लॅक, विवा मॅजेंटा आणि ग्लेशियर ब्लू शेड्समध्ये देखली येतो.
Motorola Edge 40 Neo चा बेस मॉडेल ८जीबी रॅम व १२८जीबी स्टोरेजसह २२,९९९ रुपयांमध्ये फ्लिपकार्ट आणि मोटोरोला इंडिया वेबसाइटच्या माध्यमातून विकत घेता येईल. १२जीबी रॅम व २५६जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत २४,९९९ रुपये आहे. नवीन पीच फज कलर ऑप्शनसह फोन ब्लॅक ब्यूटी, कॅनल बे आणि सूथिंग सी व्हेरिएंटसह उपलब्ध आहे.
Motorola Razr 40 Ultra चे स्पेसिफिकेशन
रेजर ४० अल्ट्रा मध्ये ६.९-इंच FHD pOLED मुख्य डिस्प्ले मिळतो जो १६५हर्ट्झ रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. तर फोनचा कव्हर डिस्प्ले ३.६-इंचाचा pOLED डिस्प्ले आहे जो १४४हर्ट्झ रिफ्रेश रेट वर चालतो. हँडसेटमध्ये स्नॅपड्रॅगन ८ जेन १ चिपसेट देण्यात आला आहे. जोडीला ८जीबी एलपीडीडीआर५ आणि २५६जीबी यूएफएस ३.१ स्टोरेज मिळते. हा अँड्रॉइड १३ आधारित MyUX वर चालतो.
डिवाइसमध्ये १२मेगापिक्सलचा ओआयएस आणि १३मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड रियर सेन्सर आहे. फ्रंटला डिवाइसमध्ये ३२ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळतो. आयपी५२ रेटेड डिवाइसमध्ये ३०वॉट वायर्ड आणि ५वॉट वायरलेस चार्जिंगसह ३,८००mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. कनेक्टिव्हिटीसाठी, डिवाइसमध्ये चार्जिंग आणि डेटा ट्रांसफरसाठी वाय-फाय ६, ब्लूटूथ ५.३, एनएफसी आणि एक यूएसबी टाइप-सी यूएसबी २.० पोर्ट मिळतात. हा फोन साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरसह बाजारात आला आहे.