Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
या तरुणीचा मृतदेह खारघरच्या जंगलामध्ये पोलिसांना आढळून आला. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर तरुणीचे एका मुलासोबत पाच वर्षांपासून प्रेम संबंध होते. मात्र काही क्षुल्लक कारणांवरून दोघांमध्ये वाद झाले. त्यानंतर मुलीने हे रिलेशन नको, असा निर्णय घेतला. त्यावरून दोघांमधला वाद टोकाला गेला. प्रियकराने रागाच्या भरात मुलीची गळा दाबून हत्या केली. प्रियकराने देखील एक चिठ्ठी लिहून स्वतः ट्रेन मधून उडी घेत स्वतःचे आयुष्य संपवलं. त्यांनं चिठ्ठीमध्ये लिहिले की, मी वैष्णवीची हत्या केली आहे. मी स्वतःही आत्महत्या करत आहे. याला कोणालाही जबाबदार धरू नये असं त्यानं चिठ्ठीत लिहिलं होतं. त्यावरून हा खुलासा झाला.
त्यानंतर पोलिसांनी ड्रोनच्या सहाय्याने मुलीचा शोध घेतला तर खारघरच्या जंगलामध्ये या मुलीची बॉडी आढळून आली असल्याचे क्राईम ब्रँचचे अमित काळे यांनी सांगितले. कळंबोली पोलीस ठाण्यामध्ये वैष्णवी मनोहर बाबरही मुलगी कॉलेजला जाते असे सांगून घरातून निघून गेली होती. ती घरी परत न आल्याने तिच्या आईने ती हरवल्याची तक्रार दाखल केली होती. त्या अनुषंगाने पोलिसांनी शोध घेतला. मात्र त्याच दिवशी त्या मुलीचा प्रियकर वैभव बुरुंगले याने जुईनगर रेल्वे स्टेशन येथे रेल्वेखाली आत्महत्या केली होती. दोघांच्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही फुटेजने हे दोघे एकत्र असल्याचे समजले.
कळंबोली पोलिसांनी मिसिंग मुलीचा शोध घेतला. मात्र त्यांना त्या मुलीचा शोध लागला नाही. त्यानंतर एक विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले. मुलीचा शोध सुरू झाला. सीसीटीव्ही फुटेज आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बेपत्ता मुलगी वैष्णवीबाबत आणि मयत वैभव बुरुंगले हे दोघे सकाळी अकरा वाजल्यापासून दुपारी चार वाजेपर्यंत एकत्र खारघर हिल्स परिसरात असल्याचे दिसून आले. त्याच दिवशी बेपत्ता मुलीचा खून करून प्रियकराने जुईनगर रेल्वे स्टेशन येथे आत्महत्या केल्याचे त्याच्या मोबाईलमधील सुसाईड नोटमधील सांकेतिक शब्द १०१- ५०१ तसेच इतर माहितीच्या आधारे दिसून आले.
त्या अनुषंगाने खारघर हिल्स परिसरामध्ये ड्रोनच्या मदतीने शोध सुरू झाला. खारघर भागातील ओवे कॅम्प डम्पिंग ग्राउंड येथील झाडे झुडपामध्ये बेपत्ता मुलीच्या वर्णनासारखी कुजलेल्या अवस्थेमध्ये एका स्त्रीचा मृतदेह आढळून आला. तिच्या अंगावरील शर्ट, कॉलेजच्या आयकार्डची रिबन, हातातील घड्याळ यावरून ती वैष्णवी असल्याचे तिच्या आई-वडिलांनी ओळखले. या प्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.