Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
महायुतीला १७० जागा
राष्ट्रवादीच्या महिला मेळाव्यात २०२४ मध्ये अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत, अशी इच्छा रुपाली चाकणकर यांनी व्यक्त केली. त्याबाबत विचारता, ‘ज्यांचे १४५ पेक्षा जास्त बहुमत असेल ते पुढे जाईल. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि सेना यांच्यापैकी १०५ आमदार हे भाजपचे राहिले. ते वगळता अन्य पक्षांचे आमदार ६५ ते ७० दरम्यान होते. त्यामुळे दोन पक्षांना ६५ -६५ जागा मिळाल्या तरी ‘फोड जोड’ हे चालूच राहणार आहे. जास्तीत जास्त बहुमत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्या नेतृत्वाखालील महायुतीला मिळण्याची शक्यता दिसते. त्यामुळे किती ही म्हटले कमी जास्त जागा झाल्या तरी आम्ही तीनही पक्ष १७० च्या पुढे जागा घेऊ,’ असा विश्वास डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केला.
शिवसेनेचे आमदार आयोध्याला जाणार
एकनाथ शिंदे हे आमचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते आहेत. ते आयोध्याला जाणार आहोत. तेथे रामलल्लांची प्रार्थना करणार आहेत. त्यानंतर आम्ही लवकरच सर्व आमदार- खासदार तेथे जाऊन दर्शन घेणार आहोत. कोणी आयोध्याला जावो अथवा जाऊ नये यापेक्षा त्यांची रामाप्रति असलेली आस्था महत्वाची. हजारो लोक घरातून, जवळच्या मंदिरात जाऊन प्रार्थना करतील. त्यात कोणीही राजकारण करता कामा नये, याकडे डॉ. गोऱ्हे यांनी लक्ष वेधले.
मोदींना आता, पवारांना नंतर दर्शन?
शरद पवार यांना रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेचे निमंत्रण देण्यात आले आहे. त्याचे आभार मानत राम मंदिर पूर्ण झाल्यास दर्शनाला येईन, असे पवार यांनी कळविले. त्याबाबत विचारता, डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, ‘पवार साहेबांना सर्वजण चांगले ओळखतो. कधी कोणी रामाचे दर्शन घ्यावे हा त्या व्यक्तीचा निर्णय असतो. मी आस्तिक व्यक्ती आहे. त्यामुळे कधी कोणाला दर्शन द्यायचे हे देव ठरवत असतो. त्यामुळे नरेंद्र मोदींना मंदिर पूर्ण होण्यापूर्वीच रामाने दर्शन द्यायचे ठरविले असेल. पवार साहेबांना मंदिर पूर्ण झाल्यानंतर दर्शन देण्याचे ठरवले असेल. त्यामुळे शेवटी दर्शन कधी द्यायचे हे श्रीरामच ठरवतात ना.’
ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने कार्यक्रम
येत्या २३ जानेवारीला बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. त्यानिमित्ताने शिवसेनेचे राज्यभरात कार्यक्रम करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसैनिकांना आदेश दिला आहे. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण करत कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Read Latest Maharashtra News And Marathi News
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.