Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२ ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर; ६२२ गुणांसह विनायक पाटील राज्यातून प्रथम

11

MPSC Mains Result : एमपीएससीकडून घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षा २०२२ ची मेरिट लिस्ट जाहीर करण्यात आली असून, ६२२ गुण मिळवून विनायक नंदकुमार पाटील याने राज्यात पहिला येण्याचा मान मिळवून राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२ मध्ये बाजी मारली आहे. ६०८.७५ गुणांसह धनंजय वसंत बांगर हा दुसरा तर, ६०६.७५ गुण मिळवून सौरभ केशवराव गावंडे हा राज्यातून तिसरा आला आहे.

यासोबतच, मुलींमध्ये पूजा अरुण वंजारी आणि प्राजक्ता पाटील यांनी बाजी मारली असून, या दोघींनीही राज्यात मुलींमधून पहिला आणि दुसरा क्रमांक पटकावला आहे. पूजला एकूण ५७०.२५ एवढे गुण मिळाले आहेत.

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२ चा निकाल एमपीएससीच्या अधिकृत वेबसाइटवर जाहीर करण्यात आला. यासोबतच, अंतिम गुणवत्ता यादीही जाहीर करण्यात आली आहे. आतापर्यंतची राज्यसेवेची सर्वात मोठी जाहिरात असून एकूण ६१३ पदांसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. विशेष म्हणजे आजच राज्यसेवेच्या दुपारी मुलाखती घेण्यात आल्या आणि संध्याकाळी मेरिट लिस्ट जाहीर करण्यात आली आहे.

मेरिट लिस्ट जाहीर झाल्यानंतर आता उमेदवारांना आपला पसंतीक्रम द्यायचा आहे. २२ ते २९ जानेवारी २०२४ या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने उमेदवारांना आपला पसंतीक्रम द्यायचा आहे. त्यानंतर या परिक्षेचा अंतिम निकाल जाहीर करण्यात येणार असल्याचे एमपीएससीने स्पष्ट केले आहे.

उमेदवारांकडून विहित पध्दतीने प्राप्त पसंतीक्रमाच्या आधारे अंतिम निकाल आणि शिफारशीसंदर्भात पुढीलप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल

राज्यसेवा परीक्षा २०२२ मधील गुणवंत

मुलांमधील पहिले तीन क्रमांक :

राज्यात पहिला : विनायक नंदकुमार पाटील
राज्यात दुसरा : धनंजय वसंत बांगर
राज्यात तिसरा : सौरव केशवराव गावंडे

मुलींमधील पहिले क्रमांक :

राज्यात पहिली : पूजा अरूण वंजारी
राज्यात दुसरी :प्राजक्ता संपतराव पाटील
राज्यात तिसरी : अनिता विकास ताकभाते

पसंतीक्रम देण्यासाठी (उमेदवारांसाठी महत्त्वाचे) :

  • अधिकृत वेबसाइटद्वारे उपलब्ध करून देण्यात आलेल्या सर्व २३ संवर्गाकरीता १ ते २३ मधील पसंतीक्रम अथवा No Preference’ पैकी पर्याय निवडणे अनिवार्य आहे.
  • अधिसूचित सर्व संवर्ग / पदांसाठी १ ते २३ मधील पसंतीक्रम निवडणा-या उमेदवारांचा त्यांनी दिलेल्या पसंतीक्रमानुसार सर्व पदांवरील निवडीकरीता विचार केला जाणार आहे.
  • अधिसूचित २३ संवर्गापैकी / पदांपैकी ज्या पदांवरील निवडीकरिता इच्छुक आहे; केवळ त्याच पदाकरिता पसंतीक्रम सादर करावेत, ज्या पदांवरील निवडीकरिता इच्छुक नाही; त्या पदांकरीता ‘No Preference’ हा पर्याय निवडावा.
  • संवर्गाचे पसंतीक्रम सादर केल्यानंतर ‘Download PDF’ हा पर्याय निवडून उमेदवाराने सादर केलेले पसंतीक्रम जतन करून ठेऊ शकतील.
  • आपले पसंतीक्रम सादर करणारे उमेदवार ज्या संवर्ग / पदांकरीता पसंतीक्रम ऑनलाइन पध्दतीने सादर करतील केवळ त्याच संवर्ग / पदांवरील निवडीकरीता त्यांचा विचार करण्यात येईल.
  • विहित कालावधीनंतर संवर्ग / पदांचे पसंतीक्रम सादर करण्याची अथवा बदलण्याची उमेदवाराची विनंती कोणत्याही परिस्थितीत मान्य केली जाणार नाही.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.