Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

नागपूरकरांना मोठा दिलासा, लॉकडाऊनबाबत विजय वडेट्टीवार यांनी दिली स्पष्ट माहिती

12

हायलाइट्स:

  • नागपूरकरांना मोठा दिलासा
  • लॉकडाऊनबाबत विजय वडेट्टीवार यांनी दिली स्पष्ट माहिती
  • निर्बंध लादण्यात येणार असल्याचं विधान नितीन राऊत यांनी केलं होतं

मुंबई : राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी नागपूरमध्ये करोनाची तीसरी लाट आल्याबाबत मोठं विधान केलं होतं. यावर पुढील काही दिवसांमध्ये नागपूरमध्ये निर्बंधही लादले जातील असंही त्यांनी म्हटलं होतं. त्यावर नागपूरकरांना आता मोठा दिलासा मिळाला आहे. मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी नागपूरकरांसाठी मोठी घोषणा केली आहे. (Vijay Vadettiwar gave clear information that there will be no lockdown in Nagpur)

राज्यातील संपूर्ण जिल्ह्यांमध्ये निर्बंध लागले तरीही एकट्या नागपूरसाठी लॉकडाऊन करण्यात येणार नाही असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. त्यामुळे नागपूरकरांसाठी ही अतिशय महत्त्वाची बातमी आहे. खरंतर, गेल्या काही दिवसांमध्ये नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणात करोना रुग्णांची संख्या समोर येत होती. त्यामुळे अतिदक्ष राहत नागपूरमध्ये निर्बंध लादण्यात येणार असल्याचं विधान नितीन राऊत यांनी केलं होतं. पण यावर आता विजय वडेट्टीवार यांनी निर्बंध लादले जाणार नाही असं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे नागपूरकरांसाठी ही अतिशय महत्त्वाची आणि चांगली बातमी आहे.
राजकीय खळबळ, सदाभाऊ खोत यांच्या मुलासह चौघांवर गुन्हा दाखल
काय म्हणाले होते नितीन राऊत?

राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी महाराष्ट्रातील नागपूर शहरात करोनाच्या तिसऱ्या लाटेच्या प्रकरणांबाबत मोठे विधान केले आहे. नागपुरात ज्या प्रकारे करोनाची प्रकरणं दुप्पट वेगाने बाहेर येत आहेत. त्यामुळे इथं करोनाची तिसरी लाट नागपुरात आली असल्याचं नितीन राऊत म्हणाले होते म्हणून आपण खूप सावधगिरी बाळगली पाहिजे, असंही ते म्हणाले.

या प्रकरणाबाबत लवकरच आपत्ती व्यवस्थापनाची बैठक बोलावली जाईल, असेही राऊत म्हणाले. याशिवाय शहरात काही निर्बंध पुन्हा लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता करोनाची प्रकरणं वाढल्यामुळे पुन्हा लॉकडाऊन होणार अशी चर्चा रंगताच नागरिकांमध्ये संताप पसरला होता.

यावेळी बोलताना नितीन राऊत यांनी भविष्यात लादल्या जाणाऱ्या इतर निर्बंधांचीही रूपरेषा सांगितली. ते म्हणाले की, सध्या ७८ नमुने जीनोम चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत. इतकंच नाहीतर, जे रेस्टॉरंट्स रात्री १० पर्यंत खुले होते, ते आता ८ पर्यंत खुले राहतील आणि जी दुकाने रात्री ८ पर्यंत खुली होती. त्यांना आता फक्त ४ वाजेपर्यंत उघडण्याची परवानगी असेल. याशिवाय शनिवार-रविवारी बाजार बंद ठेवावा लागेल. मात्र, या नियमांची अंमलबजावणी होण्याआधीच वडेट्टीवार यांनी नागपूरकरांना दिलासा दिला आहे. (Vijay Vadettiwar gave clear information that there will be no lockdown in Nagpur)
बेळगावच्या निकालाचे आकडे ट्वीट करत नीलेश राणे म्हणाले…

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.