Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
फेसबुक पेज बनवून पैसे कमवा
ज्या लोकांना व्हिडीओ एडिटिंग, ग्राफिक डिजाइनिंग, कंटेंट रायटिंग इत्यादी कौशल्य अवगत आहे ते कंटेंट-आधारित फेसबुक पेज सुरु करू शकतात. तुम्ही फेसबुक पेज बनवून देखील कमाई करू शकता. कंटेंट चांगला असेल तर प्रेक्षक वाढतील, त्यामुळे प्लॅटफॉर्मवर आणि बाहेरून देखील वेगवेगळ्या पद्धतीने पैसे कमवता येतील. तुम्ही पेज किंवा ग्रुपच्या माध्यमातून प्रोडक्ट आणि सेवा विकू शकता किंवा तुमच्या वेबसाइटवर ट्रॅफिक आणण्यासाठी देखील त्याचा वापर करू शकता. फेसबुक पेज किंवा ग्रुप बनवणे मोफत आहे.
व्हिडीओ कंटेंट बनवून पैसे कमवा
जर तुम्ही फेसबुकवर व्हिडीओ कंटेंट अपलोड केला तर त्यातून चांगली कमाई मिळू शकते. क्रिएटर्स फेसबुक व्हिडीओवर in-stream ads करून पेमेंट मिळवता येईल. या छोट्या जाहिराती आहेत, ज्या तुमच्या फेसबुक व्हिडीओ दरम्यान दिसतात. ज्यांचे प्री-रोल, मिड-रोल, इमेज आणि पोस्ट-रोल असे चार प्रकार आहेत.
फेसबुक इन-स्ट्रीम अॅडसाठी पुढील गोष्टी आवश्यक आहेत:
- १०,००० पेज फॉलोअर्स.
- असे व्हिडीओ जे कमीत कमी एक मिनिट मोठे आहेत.
- गेल्या ६० दिवसांत कमीत कमी ६००००० मिनिटांचा व्यू-टाइम.
- कमीत कमी ५ सक्रिय व्हिडीओ.
Facebook वर in-stream ads कश्या इनेबल करायच्या
Facebook वर in-stream ads इनेबल करण्यासाठी पुढील स्टेप फॉलो करा:
- यासाठी तुम्हाला क्रिएटर स्टूडियोच्या ‘होम’ टॅबवरून ‘व्हिडीओ’ निवडा.
- तुमचा नवीन व्हिडीओ अपलोड करा.
- त्यानंतर In-Stream Ads निवडा.
- व्हिडीओमध्ये ad breaks लावण्याचा पर्याय आहे. सुरु करण्यासाठी फक्त क्रिएटर स्टूडियोच्या इन-स्ट्रीम अॅड सेक्शन मध्ये Choose Placements बॉक्स चेक करा.
फेसबुक मार्केटप्लेसवरून पैसे कमवा
फेसबुक मार्केटप्लेस पैसे कमवण्याची सर्वात सोपी आणि वेगवान पद्धत आहे. सर्वात चांगली बाब म्हणजे विक्रेता बनण्यासाठी तुम्हाला काही खास कौशल्य आवश्यक नाहीत.
इथे जो प्रोडक्ट विकायचा आहे तो लिस्ट करण्यासाठी तुम्हाला फक्त फेसबुक मार्केटप्लेसवर जावं लागेल आणि Create New Listing वर टॅप करा. त्यानंतर तुम्हाला फक्त त्या प्रोडक्टची इमेज, माहिती आणि किंमत सबमिट करावी लागेल.
फेसबुक मार्केटप्लेस निःशुल्क सुविधा आहे. तुम्ही आपल्या स्वतःच्या सोशल नेटवर्कच्या माध्यमातून हजारो लोकांपर्यंत पोहचू शकता.
Influencer बनून फेसबुकवर पैसे कमवा
फेसबुकवरून कमाई करण्यासाठी Influencer marketing देखील एक चांगली पद्धत आहे. कारण Influencer कडे फॉलोअर्स जास्त असतात, त्यामुळे त्यांच्या माध्यमातून कंपन्या प्रोडक्टचा प्रचार करतात करतात.
तुम्ही देखील इन्फ्लुएंसर बनून कमाई करू शकता, परंतु यासाठी तुम्हाला फॉलोअर्सची संख्या वाढवावी लागेल. इन्फ्लुएंसर ब्रँड सोबत भागेदारी करून कमाई करतात, त्याबदल्यात ब्रँड मेसेज आणि प्रोडक्टचा प्रचार केला जातो.
Affiliate च्या माध्यमातून फेसबुकवर पैसे कमवा
Affiliate मार्केटिंग देखील फेसबुकवरून पैसे कमवण्याची एक पद्धत आहे. याच्या माध्यमातून कोणत्याही व्यक्तीला ऑनलाइन रिटेलरच्या वेबसाइटवर विक्रीसाठी कमीशन मिळतं. फेसबुकवर मोठा युजर्सबेस आहे त्यामुळे Affiliate marketing साठी चांगली जागा आहे. तुम्ही फेसबुक पेज बनवू शकता आणि प्रेक्षकांसाठी नियमित कंटेंट पोस्ट करू शकता. त्यातून चांगल्या संख्यने फॉलोअर्स मिळाले तर तुम्ही ऑनलाइन डील, डिस्काउंट, व्हाउचर आणि इतर अनेक गोष्टींचा प्रचार करू शकता.
Facebook वर कंटेंट Monetize करण्याची पद्धत
जर तुम्ही कंटेंट क्रिएटर असाल तर पुढे आम्ही काही पद्धतींची माहिती दिली आहे ज्यांच्या मदतीनं फेसबुक वर कमाई करता येईल:
ब्रँड्स सोबत भागेदारी करा
फेसबुकवर ब्रँड्स सोबत मिळून काम करता येतं आणि कमाई वाढवता येते. यासाठी तुम्हाला त्यांच्याशी संपर्क साधावा लागेल. परंतु ब्रँड्सना आकर्षित करण्यासाठी तुमच्याकडे जास्त फॉलोअर्स असणे आवश्यक आहे. काही ब्रँड तुम्हाला रेफरलच्या आधारावर पेमेंट करतील, तर इतर तुम्ही केलेल्या प्रचाराच्या आधारावर.
ब्रँड कोलॅबरेशन प्रोग्राम ज्वाइन करा
जर तुम्ही फेसबुकचा ऑफिशियल ब्रँड कोलॅबरेशन प्रोग्राम जॉईन करू इच्छित असाल तर तुमच्या फेसबुक पेजवर कमीत कमी १,००० फॉलोअर्स असावे. तसेच गेल्या दोन महिन्यात १५,००० पोस्ट इंगेजमेंट किंवा १८०,००० मिनट व्यूज टाइम असणं आवश्यक आहे.
इन-स्ट्रीम जाहिरात
या त्या जाहिराती आहेत ज्या तेव्हा येतात जेव्हा तुम्ही फेसबुकवर लाइव्ह-स्ट्रीमिंग करता किंवा जेव्हा एखादा व्यूअ ऑन-डिमांड व्हिडीओ पाहता. फेसबुकवर अशाप्रकारे पेमेंट मिळवण्यासाठी तुम्हाला गेल्या ६० दिवसांत जवळपास ६००००० मिनट व्यूज टाइम हवा.
फॅन सब्सक्रिप्शन
फेसबुककडे invite-only program आहे जो तुम्हाला खास कंटेंट, डिस्काउंट सेल आणि लाइव्ह व्हिडीओ सारख्या वस्तूंच्या माध्यमातून पैसे कमावण्याची सुविधा देतो. तुम्हाला या कार्यक्रमसाठी अर्ज करावा लागेल.