Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

पुणे लोकसभा इच्छुकांच्या मैदानात आणखी एक पैलवान मैदानात, भाजपमध्ये चुरस वाढली

8

पुणे : पुणे लोकसभेसाठी २०२४ च्या इच्छुक उमेदवारांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. इच्छुकांच्या यादीमध्ये भाजपकडून शिवाजी माधवराव मानकर हे देखील पुणे लोकसभेच्या जागेसाठी इच्छुक असल्याचं त्यांनी जाहीर पत्रकार परिषदेत बोलून दाखवलं. शिवाजी मानकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) शहर अध्यक्ष दीपक मानकर यांचे बंधू आहेत. गेले कित्येक वर्षांपासून ते नाशिक शहरात भाजपमध्ये सक्रिय राहून काम करत होते. मात्र आता त्यांनी आपले मूळ गाव असणाऱ्या पुण्याकडे मोर्चा वळवल्याचं दिसत आहे. त्यामुळे आता भाजपमध्ये उमेदवारीसाठी चुरस वाढताना दिसत आहे.

राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याच्या मुहुर्तावर अनेक इच्छुक उमेदवार राम भक्तीचे कार्यक्रम आयोजित करत आहे. असाच एक कार्यक्रम शिवाजी मानकर यांच्याकडून आयोजित करण्यात आला आहे. या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत मानकर यांनी आपणही लोकसभेसाठी इच्छुक असल्याचं बोलून दाखवलं आहे. २२ रोजी राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यादरम्यान पुण्यात महालक्ष्मी लॉन्स येथे महाआरतीचा कार्यक्रमासह शंखनादाचा कार्यक्रम मानकर यांच्या माध्यमातून भव्य स्वरूपात पार पडणार आहे.

कोण आहेत शिवाजी मानकर?

  • राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर अध्यक्ष दीपक मानकर यांचे बंधू
  • शिवाजी मानकर हे १९९६ पासून भारतीय जनता पार्टीत सक्रीय काम
  • २०१४ साली येवला विधासभा मतदारसंघाततुन छगन भुजबळ यांच्या विरोधात लढत
  • प्रगतशील बागायतदार शेतकरी म्हणून नाशिक जिल्ह्यात ओळख

भारतीय जनता पार्टीचे पुण्याचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. माजी महापौर मुरलीधर मोहळ, माजी आमदार आणि पुणे शहराचे भाजपाध्यक्ष राहिलेले जगदीश मुळीक, आरएसएसचे सुनील देवधर हे प्रबळ दावेदार इच्छुकांच्या उमेदवारांमध्ये यादीत होते. त्यात आता शिवाजी मानकर यांनी भर पडली आहे.

शिवाजी मानकर हे मूळचे नारायण पेठेतले… राष्ट्रवादीचे आक्रमक नेते दीपक मानकर यांचे बंधू आहेत. मूळ पेठेतले असल्याकारणाने त्यांना कसब्यातली मतं मिळू शकतात, तसेच दीपक मानकर यांचंही त्यांना पाठबळ असेल. भाजप मानकर यांचा विचार करणार का? हे पाहावं लागेल.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.