Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

राज्यातील निर्बंध कधीपासून कडक होणार? आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका

6

हायलाइट्स:

  • कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका
  • राजेश टोपे यांनी राज्यातील निर्बंधांबाबत दिली माहिती
  • कोविड नियमांचं पालन करून उत्सव साजरा करण्याचंही केलं आवाहन

मुंबई : कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता आगामी सण उत्सवाच्या काळात राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांसह जनतेनं करोना प्रतिबंधक नियमांचं पालन करावं, असं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे. तसंच यावेळी राजेश टोपे यांनी राज्यातील निर्बंधांबाबतही (Rajesh Tope Reaction On Lockdown In Maharashtra) माहिती दिली आहे.

‘सध्या राज्यात निर्बंध वाढवण्याबाबत आरोग्य विभाग आणि मुख्यमंत्री यांचा कोणताही विचार नसून संपूर्ण परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. रुग्णसंख्या कुठे वाढत आहे? का वाढत आहे, यावर विशेष लक्ष आहे. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा अनुभव लक्षात घेऊनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सल्ल्याने पुढील निर्णय घेण्यात येणार आहेत,’ असं आरोग्यमंत्री टोपे यांनी स्पष्ट केलं. नागपूरच्या बाबतीत तेथील आकडे आणि परिस्थिती पाहून मुख्यमंत्री निर्णय घेतील, असंही त्यांनी सांगितलं आहे.

corona in maharashtra latest updates: चिंताजनक! आज राज्यात करोनाच्या रुग्णसंख्येत वाढ; मृत्यूही वाढले

निर्बंध कधीपासून कडक होणार?

राजेश टोपे म्हणाले की, ऑक्सिजनच्या बाबतीत गेल्या वेळी १३०० मेट्रिक टनापर्यंत आपली क्षमता होती, आता १४०० ते १५०० मेट्रिक टन इतकी वाढ झाली आहे. ऑक्सिजनच्या ४५० प्लान्टची उभारणी करण्यात येत असून त्यातील अडीचशे प्लान्टस उभारले आहेत, उर्वरित प्लान्ट लवकरच कार्यन्वित होतील. ऑक्सिजनची साठवणूक क्षमता वाढवण्यासह ड्युरा सिलेंडर्सची संख्या वाढवत असून त्यामुळे आपल्याकडे १९०० ते २००० मेट्रिक टनापर्यंत ऑक्सिजनची उपलब्धता होऊ शकते. केंद्र सरकारने तिसऱ्या लाटेचा अंदाज व्यक्त करताना खूप मोठा आकडा सांगितला आहे. ज्यादिवशी ७०० मेट्रिक टनच्या वर ऑक्सिजनचा वापर होईल त्यावेळी निर्बंध सुरू करू, अशा प्रकारची अधिसूचना आरोग्य विभागाने काढली आहे, त्याला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे, असं सांगून ही दक्षता लोकांच्या जीवितेच्या दृष्टिकोनातून घेणे आवश्यक असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.

Cm Uddhav Thackeray: अनधिकृत फेरीवाल्यांचा उच्छाद आटोक्यात आणावाच लागेल; मुख्यमंत्री कडाडले

५ जिल्ह्यांत एकूण रुग्णसंख्येच्या ७० टक्के रुग्ण

केरळमध्ये ओणमच्या सणानंतर रुग्णवाढ झाली आहे, एका-एका दिवसात ३१ हजारांपेक्षा जास्त रुग्णवाढ झाली आहे, गर्दी करून नियम नाही पाळले तर रुग्णसंख्या वाढणारच हे यातून स्पष्ट झालं आहे. आज राज्यातील ४ ते ५ जिल्ह्यातच एकूण रुग्णसंख्येच्या ७० टक्के रुग्णसंख्या आहे, त्यात अहमदनगर, रत्नागिरी, सातारा, मुंबई, पुणे या जिल्ह्यांचा समावेश आहे, त्यामुळे शिस्त पाळावीच लागेल, नियमांचं पालन करावंच लागेल तरंच तिसरी लाट रोखता येईल, असंही टोपे यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, आगामी गणेशोत्सवासाठी शुभेच्छा देतानाच शासनाच्या कोविड प्रतिबंधक नियमांचे पालन करण्याची आवश्यकता आहे. केंद्र सरकारने केरळ आणि महाराष्ट्राला गर्दी टाळण्याची जाणीव करून दिली आहे, त्यामुळे येथील मंडळांनी, गणेश भक्तांनी शिस्तबद्धपणे कोविड नियमांचं पालन करून हा उत्सव साजरा करण्याचं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.