Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
गॅस कटरने ATM फोडुन रोकड पळवणारी परप्रांतिय ईसमास स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद, गुन्हयात वापरलेल्या MG Hector वाहनासह एकास हरियाणा येथून अटक २ गुन्हे केले उघड…
अमरावती(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक ०८/०१/२०२४ चे रात्री दरम्यान गॅस कटरचे सहाय्याने वरुड शहरातील SBI बँकेचे ATM . फोडुन नगदी ४१,४७,०००/- रू चोरून नेले होते. घटनेच्या अनुषंगाने पो.स्टे. वरूड अप. क्रं. १३ / २४ कलम ४५७, ३८० भा.दं. वी. तसेच पो.स्टे. तिवसा परीसरातील २० लाखापेक्षा जास्त ची रक्कम चोरुन नेली होती त्यानुसार पोलिस स्टेशन तिवसा येथे अप.कं. १२/२४ कलम ४५७, ३८० भादवि चा नोंद करण्यात आला होता
सदर गुन्हयाचे गांभीय पाहता घटनास्थळावर पोलिस अधिक्षक विशाल आनंद,अपर पोलिस अधिक्षक विक्रम साळी, उपविभागिय पोलिस अधिकारी डॅा. निलेश पांडे, उपविभागीय पोलिस अधिकारी,मोर्शी यांनी भेटी दिल्या होत्या तसेच पोलीस अधिक्षक, अमरावती ग्रा. यांनी सदर गुन्हयातील आरोपी निष्पन्न करून गुन्हा उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शन करून स्था.गु.शा. चे ०४ तसेच पोलिस स्टेशनचे ०२ असे एकुण ०६ पथके तयार करण्यात आली होती.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सदर गुन्ह्याचा समांतर तपास करित असतांना गुप्त बातमीदारकडुन मिळालेल्या माहीती नुसार सदर गुन्हयात आरोपींनी वापरलेले वाहन हे MG Hector HR 93/A/4248 हे असल्याचे निर्दशनास आले व सदर वाहन हे
मोहम्मद तौफीक मोहम्मद कमरूद्दीन, वय ३२ वर्षे, रा. जमालगड, ता. पुन्हाना, जि. नुह, राज्य हरियाणा
याचे नावाने असल्याचे निष्पन्न झाले.वरिष्ठांचे आदेशाने स्थानिक गुन्हे शाखा, अमरावती ग्रामीण येथील पथक गुन्हयाचा समांतर तपास करित असतांना तपास पथकाने हरियाणा राज्यातील ग्राम जमालगड, ता. पुन्हाना, जि. नुह येथे जावुन अधिक माहीती संकलीत करून नमुद वाहन मालक मो. तौसीफ यास ताब्यात घेवून गुन्हयाबाबत विचारपुस केली असता त्याने सांगीतले की, दि. ०७/०१/२०२४ रोजी त्याचा मित्र
मोहम्मद जमशेद ऊर्फ पिट्टल पिता ईलीयास रा.नावली, ता. फिरोजपुर, जि. नुह ह.मु. खानपुर खेडी जि.नुह
इतर साथीदार यांनी बाहेर राज्यात जाबुन कोण्यातरी ठिकाणी ATM फोडुन चोरी करावयाचे असल्याने तेथे जाणे करीता तौफीक यास त्याचेकडील MG Hector वाहनाची मागणी केली. तौफीक, जमशेद, शाहीद व इतर ०२ साथीदारांनी मिळून ATM फोडण्याचे ठरवीले व तौफीकने त्याचे वाहन जमशेद व इतर साथीदारांना दिले. त्यानंतर जमशेद व त्याचे इतर साथीदारांनी दि.८/१/२४ रोजीचे रात्रीला पो.स्टे. वरूड व तिवसा हद्दीत वरील प्रमाणे दोन ठिकाणी SBI बँकेचे ATM गॅस कटरचे सहाय्याने फोडुन चोरी करून दि.१०/०१/२०२४ रोजी MG Hector वाहन घेवुन परत गावी (हरियाणा) गेले व मोहम्मद तौफीक यास त्याचा हीस्सा नगदी १,७०,०००/- रू. दिले.
आज रोजी सदर गुन्हयात वापरल्या गेलेली MG Hector HR- 93/4248 कि.अं. १०,००,०००/-रू. ताब्यात घेण्यात आली असुन सदर वाहनामध्ये स्टेपनी खालील भागात एक MP 04/EA6339 क्रमांकाची एक वेगळी नंबर प्लेट मिळुन आली. सदर नंबर प्लेट बनावट असण्याची व तिचा वापर आरोपींनी गुन्हा करतेवेळी केला असण्याची शक्यता आहे. सदर गुन्हयात इतर आरोपी
१) मोहम्मद जमशेद ऊर्फ पिट्टल पिता ईलीयास, रा. नावली, ता. फिरोजपुर, जि. नुह ह.मु. खानपुर खेडी जि. नुह
२) शाहीद मोहम्मद पिता हसन, रा. जमालगड, ता. पुन्हाना, जि. नुह ३ ) फोजी मुल्ला, रा. ओथा, ता. पुन्हाना
व इतर २ आरोपी हे फरार आहेत. त्यांच्या अटकेसाठी तसेच चोरी गेलेली रक्कम जप्त करणेसाठी वेगवेगळया पथका मार्फत कसोशीने प्रयत्न चालु आहे. आरोपी मो. तौसीफ यास वाहनासह पो.स्टे. वरूड यांचे ताब्यात देण्यात आले असुन आरोपींनी SBI ATM फोडण्यासाठी वापरलेली कार्यपध्दती पाहता ते अश्या गुन्हयात सराईत असण्याची व त्यांच्याकडुन इतरही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक विशाल आनंद, अपर पोलिस अधिक्षक,विक्रम साळी, .डॉ.निलेश पांडे, उप-विभागीय पोलिस अधिकारी,मोर्शी यांचे मार्गदर्शनाखाली किरण वानखडे, पोलिस निरिक्षक, स्था. गु.शा. यांचे नेतृत्वातील स.पो.नि.सचिन पवार, पो.उप.नि. नितीन चुलपार, संजय शिंदे नितीन इंगोले, मो. तस्लीम, सागर हटवार व स्थागुशा तसेच सायबर पो.स्टे. येथील अमंलदार यांनी केली आहे.