Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

शेतातील सोयाबीन चोरणारे स्ऱ्थागुशा पथकाचे ताब्यात…

8

वणी परीसरात  शेतमाल (सोयाबीन) चोरणार्या टोळीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २४ तासाचे आत केले जेरबंद…

वणी(यवतमाळ) प्रतिनिधी – याबबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक १९/०१/२०२४ रोजी पोलिस स्टेशन  वणी हद्दीतील

विलास दत्तुजी देउळकर वय ५० वर्षे, रा. वांजरी ह.मु. वणी

यांचे ग्राम कळमना खर्दु शिवारातील शेतात असलेल्या टिनाचे बंडयामध्ये (शेडमधे) ठेवुन असलेल्या शेतमालाची त्यांनी सायंकाळी ०४/०० वाजताचे सुमारास पाहाणी केली असता बंडयात ठेवुन असलेले सोयाबीन धान्यामधुन १५ क्विंटल सोयाबिन किमंत ६४,५००/-  रु चे चोरीस गेले असल्याचे लक्षात आल्याने त्यांनी दिनांक २०/०१/२०२४ रोजी पो.स्टे. वणी येथे दिलेल्या तक्रारी वरुन अज्ञात आरोपीतांविरुध्द अप क्र ३९/२०२४ कलम ३७९ भा.द.वि. प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता. शेतमाल चोरी संबधाने गांभीर्य लक्षात घेवून  पोलिस अधीक्षक ,यवतमाळ यांनी पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांना सदरचा गुन्हा उघडकीस आणने करीता पथक रवाना करण्याच्या सुचना दिल्या होत्या त्यावरुन स्था.गु.शा. कडील पथक वणी येथे गुन्हा उघडकीस आणन्याचे दृष्टीने गुन्हयाचा समांतर तपास करुन गुन्हेगारांचा मागोवा घेत असतांना गुन्हयाचे फिर्यादी विलास दत्तुजी देऊळकर यांचे शेतातील सालकरी गडी अनिल चव्हाण  ग्राम वांजरी  यानेच शेतातील सोयाबीन चोरले असल्याचे गोपनिय माहीतीवरुन  शेतातील सालकरी अनिल नामदेव चव्हाण वय ५० वर्षे, रा. बेघर वांजरी यास ताब्यात घेवून त्याचेकडे कोशल्यपुर्वक तपास केला असता त्याने चार ते पाच दिवसांपुर्वी त्याचे गावातील जयश देउळकर, रोशन देउळकर, व अतुल ढवस यांचे मदतीने विलास दत्तुजी देउळकर यांचे शेतातील बंड्यातुन अंदाजे २९ कट्टे सोयाबीन चोरले असल्याची व ते सोयाबीन त्याचे तिन साथीदारांनी मोटर सायकलवरुन नेवुन वणी येथे विकले असल्याची कबुली दिली. वरुन नमुद आरोपी

१) अनिल नामदेव चव्हाण वय ५० वर्षे, रा. बेघर वांजरी व त्याचे साथीदार,

२) रोशन तुळशीराम देउळकर वय ३० वर्षे,

३) जयेश शंकर देउळकर वय २० वर्षे,

४) अतुल उर्फ विवेक अवधुत धवस वय २९ वर्षे, सर्व रा. वांजरी यांना ताब्यात घेवून त्यांचेकडे सोयाबीन मालाबाबत विचारपुस करुन केलेल्या तपासात त्यांनी चोरी केलेले सोयाबिन वणी येथील १) विजय गुलाबराव निते वय ४८ वर्षे व २) चंद्रशेखर पांडुरंग देठे वय ३९ वर्षे, दोन्ही रा. चिखलगांव वणी या वेगवेगळया दुकानदारांना विक्री केले असल्याचे दिसुन आल्याने नमुद
दुकानदार यांचेकडुन अनुक्रमे १९ व १० असे २९ कट्टे अंदाजे १५ क्विटल सोयाबीन किंमत ६४,५००/ रु चे जप्त करून आरोपीतांनी
गुन्हयात वापरलेल्या ०२ मोटर सायकल किमंत ७०,०००/ रु असा एकुण १,३४,५०० रु चा मुद्देमाल जप्त करुन आरोपी

१) अनिल नामदेव चव्हाण वय ५० वर्षे, रा. बेघर वांजरी व त्याचे साथीदार, २) रोशन तुळशीराम देउळकर वय ३० वर्षे, ३) जयेश शंकर देउळकर वय २० वर्षे, ४) अतुल उर्फ विवेक अवधुत धवस वय २९ वर्षे, सर्व रा. वांजरी यांना पुढील कार्यवाही कामी पोलिस स्टेशन वणी यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई ही  पोलिस अधीक्षक यवतमाळ डॉ. पवन बन्सोड, अपर पोलिस अधीक्षक पियुष जगताप,आधारसिंग सोनोने पोलिस निरीक्षक, स्था.गु.शा. यवतमाळ, यांचे मार्गदर्शनात सपोनि अतुल मोहनकर, सपोनि अमोल मुडे, पोलिस अंमलदार सुनिल खंडागळे, सुधीर पांडे, योगेश डगवार, सुधीर पिदुरकर, निलेश निमकर, रजनीकांत मडावी, चापोहवा नरेश राउत सर्व स्था.गु.शा. यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.