Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

चालू बसमध्ये असं काय घडलं की थेट पोहोचली पोलीस ठाण्यात; नागपुरात ५ महिलांना अटक

8

म.टा. प्रतिनिधी, नागपूर : प्रवाशांचे दागिने व मौल्यवान वस्तू असलेली पर्स चोरणारी महिलांची टोळी बसमध्ये लपली. वाहतूक पोलिसांनी प्रवाशांसह चोर असलेली अख्खी बसच ठाण्यात आणली. चौकशीदरम्यान पोलिसांनी पाच महिला चोरांना अटक केली.

काय आहे प्रकरण?

रश्मिका पवन नाळे (वय २८), अनू धीरज मानकर (वय २४), शीला गोविंद मानकर (वय ४०), पायल मोनू मानकर (वय ४०) आणि सुहासिनी आकाश लोंढे (वय ३०, सर्व रा. बुटीबोरी) अशी अटकेतील महिला चोरांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरप्रीतकौर जसपालसिंग रयत (वय ४५, रा. आस्था सोसायटी, टेकानाका, पाचपाव) या आई-वडिलांना सोडण्यासाठी सदर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील लिबर्टी चौकात आल्या. त्यांनी आई-वडिलांना बसमध्ये बसविले. याचदरम्यान त्यांना घेराव घातलेल्या पाच महिलांपैकी एकीने त्यांच्या पर्समधील रोख व परवाना चोरी केला. गुरप्रीत कौर यांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यांनी आरडाआरेड केली. यावेळी वाहतूक शाखेच्या सदर झोनचे साहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे, साहाय्यक उपनिरीक्षक राजेंद्र झरबडे, विनायक इंगळे, इंदल भजन, मंदा धुर्वे आणि प्रवीण पांडे परिसरात गस्त घालत होते. त्यांनी लगेच धाव घेतली. घडलेल्या प्रकाराची माहिती घेत अन्नछत्रे यांनी संपूर्ण बसच सदर पोलिस ठाण्यात आणली. चौकशीनंतर पाच जणींना सदर पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून पाच महिलांना अटक केली.

भिंतीच्या रॉडला ओढणी बांधून गळफास

नागपूर : सक्करदरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बॉलिवूड सेंटर पॉइंटच्या सुरक्षा भिंतीच्या लोखंडी रॉडला ओढणी बांधून ४०वर्षीय युवकाने गळफास घेतला. ही घटना शुक्रवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. मृतकाची ओळख पटलेली नाही. सक्करदरा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.-अखेर विद्यार्थ्याचा मृतदेह आढळला
एक्स्प्रेस वेवर बॉडी सापडली; रात्रभर वाहनांखाली चिरडून मृतदेहाची चाळण, पोलीसही शहारले
नागपूर : पतंग पकडताना महादुल्यातील कालव्यात वाहून गेलेल्या आठवर्षीय विद्यार्थ्याचा अखेर मृतदेह आढळून आला. दयाशंकर अवधेश प्रजापती (रा. महादुला) असे मृतकाचे नाव आहे. १७ जानेवारीला दुपारी दयाशंकर व त्याचा भाऊ कैलास हे दोघे कालव्यात उतरले. दोघेही बुडायला लागले. नागरिकांनी धाव घेतली व कैलासला वाचविले. दयाशंकर हा वाहून गेला. पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. शुक्रवारी सायंकाळी दयाशंकरचा मृतदेह आढळून आला. याप्रकरणी कोराडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.