Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
लोकशाहीवर झालेला हल्ला जनता खपवून घेणार नाही. लोकशाही टिकण्यासाठी पहिजे ती किंमत आम्ही मोजू .जनता हुशार असते तिला फार काळ फसवता येत नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं.
फारुख अब्दुला म्हणाले, ‘कोणताच धर्म संकटात नसून, तसे खोटे पसरवण्यात येत आहे. पक्ष सत्तेत असताना योग्य न्यायाधीश नेमले असते, ईव्हीएम मशीन आणल्या नसत्या, त्याचबरोबर निवडणूक आयोगही मजबूत केला असता, तर आज ही वेळ आली नसती.’
प्रा. मधू दंडवते यांच्या जन्मशताब्दीनिमित्त मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित सभेत शरद पवार, फारुख अब्दुला यांनी वरील प्रतिपादन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख होते. या वेळी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले, खासदार कुमार केतकर, कर्नाटकचे मंत्री बी. आर. पाटील, माजी खासदार हुसेन दलवाई, शेकापचे जयंत पाटील आदी उपस्थित होते.
‘सावंतवाडी टर्मिनसला दंडवतेंचे नाव द्या’
प्रा. मधू दंडवते यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमाच्या निमित्ताने आठ ठराव एकमताने मंजूर करण्यात आले. यात प्रामुख्याने सावंतवाडी टर्मिनस पूर्ण करून त्यास मधु दंडवते यांचे नाव देण्यात यावे, ही मागणी करण्यात आली आहे. पश्चिम उपनगरात राहणाऱ्या लोकांच्या सोयीसाठी दररोज बांद्रा किंवा दादर पश्चिम रेल्वे टर्मिनस वरून रात्रीच्या वेळी वसईमार्गे सावंतवाडी पर्यंत ट्रेन सुरू करावी आदी मागण्या या वेळी करण्यात आल्या.
Read Latest Maharashtra News And Marathi News