Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

पोलिस उपायुक्तांचे पथकाने यशोदनगर पोलिस स्टेशन हद्दीत जुगार अड्डयावर छापा….

16

यशोदानगर पोलिस स्टेशन हद्दीत जुगार अड्ड्यावर पोलिस उपायुक्त, परिमंडळ ५, निकेतन कदम यांचे विशेष पथकाचा छापा, एकुण ४,०७,१९५/- रू. चा मुद्देमाल जप्त….

नागपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक २०.०१.२०२४ चे ३.३५ वा. ते ५.१०  वा. चे दरम्यान, पोलिस उपायुक्त परी.५ निकेतन कदम  यांचे विशेष पथकातील अधिकारी व अंमलदार हे पोलिस स्टेशन यशोधरानगर हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना, त्यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून,किशोर गंगादास सोनकुसरे, प्रवेश नगर,अल रहमान हॅाटेलच्या मागे  हा त्याचे राहते घरी जुगार अड्डा चालवतो अशा माहीतीवरुन सदर ठिकाणी छापा टाकला असता

१) किशोर गंगादास सोनकुसरे, वय ६० वर्षे हा त्याचे घरी अवैधरित्या जुगार अंड्डा चालवितांना त्याचे साथिदार
२) भरत साहेबदास बरडे, वय ४७ वर्षे, रा. तांडापेठ,

३) सुनिल तुकाराम निखारे, वय ४६ वर्षे रा. गोळीबार चौक,

४) नरेंद्र राधेशाम केसरवानी, वय ६३ वर्ष रा. शांतीनगर,

५) भोजराज लक्ष्मण सोनकुसरे, वय ४५वर्षे रा. लालगंज, झाडे चौक,

६) नंदु हरीभाऊ उमरेडकर, वय ४४ वर्षे रा. जुनि मंगळवारी,

७) मो. वकील मो. शहीद, वय ३८ वर्षे, रा. टेकानाका, नई बस्ती,

८) हर्ष आनंद पवार, वय २० वर्षे रा. खैरीपुरा, लालगंज,

९) जितेंद्र गणपत निनावे, वय ३४ वर्षे रा. तांडापेठ, नई वस्ती,

१०) राकेश बाबासिंग गायकी, वय ३७ वर्षे, रा. लालगंज,खैरीपुरा, ११) योगेश मुरलीधर पाटील, वय ४६ वर्षे रा. जागनाथ बुधवारी

१२) विक्की रामदास समुद्रे, वय ४७ वर्षे
१३) संदीप अन्ना समुद्रे, वय ३४ वर्षे दोन्हीही रा. ठक्करग्राम पाचपावली

१४) सुनिल शालीग्राम कोकाटे वय ५४ वर्षे रा. लालगंज,

१५) ईश्वर जयराम केळवदे, वय ४४ वर्षे रा. धिवरपुरा, संभाजी कासार,

१६) मो. कलीम मो. इम्रान शेख, वय ५४ वर्षे रा. कामठी,

१७) हेमराज तुळशिराम पराते, वय २७ वर्षे, रा. तांडापेठ,

१८) नामदेव बाळकृष्ण निनावे, वय ४७ वर्षे रा. शांतीनगर,

१९) जितेंद्र अशोक तमसकर, वय ४० वर्षे रा. गुलशन नगर,

२०) चैतराम आनंदराव गुमगावकर, वय ६३ वर्षे, रा. तांडापेठ,

२१) किशोर श्रीराम ठाकरे, वय ६४ वर्षे रा. कामठी
यांचेसह मिळुन आला. आरोपी क्र. १ याने बेकायदेशीर विना परवाना जागा उपलब्ध करून देवुन जुगार खेळविताना मिळुन आला. आरोपींचे ताब्यातुन रोख ४१,२००/- रू., ताशपत्ते, १८ मोबाईल फोन, ४ मोटरसायकल व ईतर साहित्य असा एकुण अंदाजे ४,०७,१९५ /- रू. चा मुद्देमाल मिळुन आल्याने तो जप्त करण्यात आला.व आरोपीविरुध्द पोलीस स्टेशन यशोधरानगर येथे आरोपींविरूध्द कलम ४, ५ म.जु.का अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास सुरू आहे.
सदरची कामगिरी पोलिस आयुक्त अमितेश कुमार,पोलिस उपायुक्त परीमंडळ ५ ,सह पोलिस आयुक्त संतोष खांडेकर मार्गदर्शनाखाली  विशेष पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जितेन्द्र ठाकुर,पोहवा अरुण चांदने,शाम कडु,पोशि अमित ठाकरे  यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.