Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Moto G54 5G वरील डिस्काउंट
या स्मार्टफोनच्या ८ जीबी रॅम व १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १५,९९९ रुपये आणि १२ जीबी रॅम व २५६ जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत १८,९९९ रुपये होती. परंतु बेस मॉडेलवर २,००० तर टॉप मॉडेल ३,००० रुपयांच्या डिस्काउंटसह आता विकला जात आहे. त्यामुळे यांची किंमत मोटोरोलाच्या ऑनलाइन स्टोर आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Flipkart वर अनुक्रमे १३,९९९ रुपये आणि १५,९९९ रुपये झाली आहे.
Moto G54 5G चे स्पेसिफिकेशन्स
Moto G54 5G मध्ये ६.५ इंचाचा आयपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. जो फुल एचडी प्लस २४०० x १०८० पिक्सल रिजॉल्यूशन आणि २०:९ अॅस्पेक्ट रेश्यो आणि १२० हर्ट्झ रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. Moto G54 5G फोनचे डायमेंशन १६१.५६x ७३.८२x ८.८९mm आणि वजन १९२ ग्राम का आहे.
हा मोबाइल अँड्रॉइड १३ वर चालतो. कंपनीनं मीडियाटेक डायमेंसीटी ७०२० प्रोसेसरचा वापर केला आहे. जो २.२ गिगाहर्ट्झ क्लॉक स्पीडवर चालतो. जोडीला बीएक्सएम-८-२५६ जीपीयू देखील आहे. डिवाइसमध्ये १२जीबी पर्यंत रॅम व २५६जीबी पर्यंत स्टोरेज देण्यात आली आहे.
फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. ज्यात ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायजेशनसह ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो.
फोनमध्ये ६०००एमएएचची मोठी बॅटरी मिळते. जी ३३ वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. डिवाइस ड्युअल सिम ५जी, वाय-फाय, ब्लूटूथ ५.३, जीपीएस, आयपी५२ रेटिंग, ड्युअल स्टीरियो स्पिकर्ससह बाजारात आला आहे. फोनमधील स्टोरेज मायक्रो एसडी कार्डच्या मदतीनं १टीबी पर्यंत वाढवता येते.