Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आतापर्यंतचा सर्वात शक्तिशाली वनप्लस भारतात लाँच; 16GB RAM सह OnePlus 12 ची एंट्री

10

चिनी स्मार्टफोन कंपनीनं गेल्यावर्षीच्या अखेरीस आपला सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन होम मार्केट चीनमध्ये सादर केला होता. तेव्हापासून या हँडसेट प्रतीक्षा भारतासह जगभरातील कंपनीच्या चाहत्यांना होती. अखेरीस कंपनीचा आतापर्यंतचा सर्वात पावरफुल स्मार्टफोन OnePlus 12 भारतीय बाजारात दाखल झाला आहे. फोनच्या कॅमेऱ्यापासून ते बॅटरी पर्यंत अनेक अपग्रेड पाहायला मिळालेलं आहेत. चला जाणून घेऊया किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

OnePlus 12 ची किंमत

वनप्लस १२ चे दोन व्हेरिएंट भारतात आले आहेत. फोनच्या १२जीबी रॅम व २५६जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ६४,९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. तर १६जीबी रॅम व ५१२जीबी स्टोरेज व्हेरिएंटसाठी तुम्हाला ६९,९९९ रुपये मोजावे लागतील. हा फोन Flowy Emerald आणि Silky Black कलरमध्ये विकत घेता येईल.

OnePlus 12 Specifications

वनप्लस १२ ५जी फोन ६.८२ इंचाच्या २के डिस्प्लेला सपोर्ट करतो. ही स्क्रीन ओएलईडी पॅनलवर बनली आहे आणि १२०हर्ट्झ रिफ्रेश रेट, २१६०हर्ट्झ पीडब्ल्यूएम डिमिंगसह ४५००निट्स ब्राइटनेसला सपोर्ट करते. फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. कंपनीनं डिस्प्लेला कॉर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टस २ ची सुरक्षा दिली आहे.

प्रोसेसिंगसाठी ह्यात क्वॉलकॉमचा सर्वात पावरफुल मोबाइल चिपसेट स्नॅपड्रॅगन ८ जेन ३ देण्यात आला आहे. जोडीला १६जीबी पर्यंत रॅमसह ५१२जीबीची स्टोरेज देण्यात आली आहे. हा मोबाइल फोन अँड्रॉइड १४ ओएसवर लाँच झाला आहे. पावर बॅकअपसाठी फोनमध्ये ५,४००एमएएचची बॅटरी आहे. तसेच ही मोठी बॅटरी वेगाने चार्ज करण्यासाठी फोनमध्ये १००वॉट फास्ट चार्जिंग आणि तसेच ५०वॉट वायरलेस चार्जिंग देखील मिळते.

नव्या वनप्लस १२ मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. ज्यात ५० एमपी सोनी एलवायटी-८०८ हा मुख्य कॅमेरा मिळतो, ज्यात OIS आहे. त्याचबरोबर ४८ एमपी सोनी आयएमएक्स५८१ अल्ट्रावाइड लेन्स आणि ३एक्स पेरिस्कोप झूम लेन्ससह ६४ एमपी ओम्नीव्हिजन ओव्ही६४बी सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी कंपनीनं फ्रंटला ३२ मेगापिक्सलचा सेन्सर दिला आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.