Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

कोल्हापूरचा पारा घसरला; रस्त्यांवर धुक्याची चादर; नागरिकांना शेकोटी आणि गरम कपड्यांचा आधार

10

कोल्हापूर: गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात थंडीचा जोर वाढला आहे. वातावरणातील या बदलामुळे मंगळवारी सकाळी कोल्हापूर धुक्यात हरवल्याचे दिसले. दरम्यान, सकाळच्या थंडीमुळे लोक गारठून गेले आहेत.शहरातील नागरिक शेकोटी करून दाट धुक्याचा आनंद लुटत आहेत.या धुक्यातून वाहन चालवताना समोरचा रस्ता स्पष्ट दिसत नसल्याने चालकांना कसरत देखील करावी लागत आहे.

सध्या महाराष्ट्रतील काही शहरांमध्ये कड्याक्याची थंडी पडली आहे.त्यामुळे महाराष्ट्रातील काही शहरांचा पारा घसरलेला आहे. कोल्हापुरात आज मंगळवारी १४° डिग्री सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली. यामुळे कोल्हापूर शहरात थंड गारवा जाणवत आहे.नागरिक शहरात जागो जागी रात्री आणि पहाटेच्या वेळीही शेकोट्या पेटवून थंडीपासून बचाव करत आहेत. दुपारीही थंड वारा सुटत असल्याने नागरिक स्वेटर, कानटोपी, जॅकेट घालून घराबाहेर पडत असल्याचे दिसते तसेच शहरातील शिवाजी विद्यापीठ, रंकाळा, सर्किट हाऊस सारख्या अनेक भागात मॉर्निंग वॉक ला जाणारे लोक आता थंड धुक्यात चहाच्या टपरीवर चहा, कॉफी चा आस्वाद घेत असताना दिसत आहेत. पुणे बंगलोर राष्ट्रीय महामार्ग देखील धुक्यात हरवून गेल्याने महामार्गावरून जाणाऱ्या चालकांना रस्ता स्पष्ट दिसत नसल्याने सावधगिरी बाळगत हेडलाईटचा आधार घेत वाहन हळू चालवावे लागत आहे.

उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट, धुळ्यात पारा ६.३ अंशावर, यंदाच्या हंगामातील नीचांकी तापमान

राज्यभरात २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान

पुणे १२.१, धुळे ६.३, जळगाव ९.०, कोल्हापूर १५.१ , महाबळेश्वर १३.५, नाशिक ११.६, निफाड ८.८, सांगली १७.७, सातारा १४.५, सोलापूर १७.६, सांताक्रूझ १२.६, डहाणू १६.५, रत्नागिरी १७.८, छत्रपती संभाजीनगर ११.५, नांदेड १६.६, परभणी १४.८. अकोला १२.८, अमरावती १४.३, बुलडाणा १२.४, ब्रह्मपुरी १७.१, चंद्रपूर १६, गडचिरोली १४.२, गोंदिया १२.९, नागपूर १४.४, वर्धा १५.५, वाशीम १२.४, यवतमाळ १५

फतेहपूरमध्ये पारा १.६ अंशांवर

राजस्थानच्या काही भागांत थंडी आणि दाट धुके कायम असून, फतेहपूर शहर राज्यातील सर्वांत थंड शहर ठरले आहे. सीकर जिल्ह्यातील फतेहपूर येथे किमान तापमान १.६ अंश सेल्सिअस; तर अलवर येथे २.८ अंश सेल्सिअस नोंदले गेले. राज्यात अनेक ठिकाणी किमान तापमान ६ अंश सेल्सिअसच्या खाली नोंदले गेले. करौली येथे ३.३ अंश, चुरू येथे ३.७ अंश, पिलानी येथे ३.६ अंश, भिलवाडा येथे ४ अंश सेल्सिअस, अंता येथे ४.४ अंश, सीकर शहरात ४.५ अंश , गंगानगर येथे ५ अंश, चित्तौडगड व बिकानेर येथे ५.५ अंश, संगरिया (हनुमानगड) येथे ५.६ अंश, जालोर येथे ५.८ अंश आणि डबोक (उदयपूर) येथे ५.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील २४ तास हवामान असेच राहणार आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.