Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
२०१८ मध्ये न्यायालयीन लढाई जिंकल्यानंतर ललित साळवेने (त्यावेळी ललिता अशी असलेली ओळख) शस्त्रक्रियांसाठी मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस भागातील सेंट जॉर्ज या सरकारी हॉस्पिटलमधील डॉक्टरांशी संपर्क साधला. यावेळी अनुवांशिकदृष्ट्या पुरुष असल्याचे ऐकून तो भारावून गेला. ललित साळवेवर शस्त्रक्रिया करणारे प्लास्टिक सर्जन डॉ. रजत कपूर म्हणाले, की मला अजूनही आठवतं, की तो जन्माने पुरुष असल्याचे ऐकून तो कसा रडायला लागला.
ललितला केवळ जननेंद्रियाच्या पुनर्रचना शस्त्रक्रियेची गरज होती. “त्याच्याकडे एक अविकसित पुरुषाचे जननेंद्रिय आणि एक अंडकोष होता” असं डॉ कपूर यांनी सांगितलं. ते पुढे म्हणाले की शस्त्रक्रिया पूर्ण होईपर्यंत, वैद्यकीय पथकाच्या लक्षात आले, की ललित साळवेची लैंगिक कार्यक्षमता सामान्य असेल आणि शुक्राणू सर्वसामान्य असतील. त्यामुळे त्याला मूल होणे हे आश्चर्यकारक नसल्याचेही डॉक्टर म्हणाले. सर्वसामान्यपणे लिंग बदल शस्त्रक्रिया करणाऱ्यांच्या आयुष्यात हा आनंद येईलच असं नसतं.
ललितची पत्नी सीमावर १५ जानेवारी रोजी सिझेरियन शस्त्रक्रिया करण्यात आली. आम्ही या क्षणी खूप आनंदी आहोत, असं ललित म्हणाला. ललितला त्याच्या कुटुंबाने मुलगी म्हणून वाढवले होते. त्याच्या बालपणी एक अंडकोष काढण्यासाठी शस्त्रक्रिया देखील केली होती.
एक मुलगी असल्याने तो नेहमीच अस्वस्थ असायचा. वयाच्या ३० व्या वर्षी त्याने लिंग बदलाचे ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला. “मला माझ्या मुलाचे चांगले संगोपन करायचे आहे, त्याच्यावर चांगले संस्कार करायचे आहेत आणि त्याला मोठा आयएएस किंवा आयपीएस अधिकारी बनण्याची संधी द्यायची आहे. असे त्याने सांगितले.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News