Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

मनोज जरांगे उद्या नवी मुंबईत पोहोचणार, अवजड वाहनांना शहरात प्रवेश बंद, कसं आहे नियोजन

11

म. टा वृत्तसेवा, नवी मुंबई : मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली २० जानेवारीपासून सुरू झालेल्या मराठा आरक्षण पायी दिंडीचा मुक्काम २५ जानेवारी रोजी नवी मुंबई शहरात होणार आहे. त्यासाठी नवी मुंबईतील मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्च्याच्या वतीने त्यांची व्यवस्था केली जात आहे. त्यानुसार, बाजार समितीमधील कांदा बटाटा बाजार आवारात या मोर्च्याचा मुक्काम होणार असून महिलांची राहण्याची व्यवस्था सिडको प्रदर्शन केंद्रात करण्यात आली आहे, अशी माहिती नवी मुंबईतील समन्वयकांनी दिली आहे. मात्र या मोर्च्यात येणाऱ्या कोट्यवधी मराठा बांधवांसाठी महापालिकेकडून अपेक्षित मदत मिळत नसल्याची खंत पत्रकार परिषदेत व्यक्त करण्यात आली.

२५ जानेवारी रोजी कोट्यवधींच्या संख्येने मराठा समाज नवी मुंबईत दाखल होणार आहे. या नियोजनाच्या तयारीसाठी ‘मराठा क्रांती मोर्चा, नवी मुंबई मध्यवर्ती कार्यालय, वॉररूम’ तयार करण्यात आले आहे. मराठा आरक्षण दिंडी मोर्चा २५ जानेवारी रोजी नवी मुंबईमध्ये मुक्कामी आहे. या दिंडी मोर्च्यात सहभागी असलेल्या मराठा समाजाच्या सोयीसाठी गाड्या पार्किंग, राहण्याची व्यवस्था, नैसर्गिक विधी व इतर सोयींसाठी कांदा बटाटा व लसूण मार्केटमधील बाजार आवारात व्यवस्था करण्यात आली आहे.

२५ जानेवारी रोजी सिडको प्रदर्शन केंद्रात महिलांची राहण्याची सोय करण्यात आली आहे. तसेच, करावे येथील तांडेल मैदान येथे आणि एपीएमसी मार्केट बंद ठेवून त्या ठिकाणी मोर्चेकऱ्यांची निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. नवी मुंबई केमिस्ट आणि ड्रग असोसिएशनच्या वतीने आरोग्यसुविधा सज्ज ठेवण्यात येणार आहे. प्रत्येक रुग्णालयात ५० टक्के खाटा राखीव ठेवल्या आहेत. प्रत्येक दोन किमीवर वैद्यकीय पथक ठेवण्यात आले आहे.

२६ जानेवारी रोजी वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे लाखोंच्या संख्येने तिरंगा फडकवून हा मोर्चा पुढे मुंबईत जाणार आहे. त्यांच्या राहण्या-खाण्याची तसेच पाण्याची, शौचालयांची व्यवस्था करण्याबाबत महापालिका, सिडको, पोलिस तसेच एपीएमसी प्रशासन यांच्याशी मराठा क्रांती मोर्चाच्या शिष्टमंडळाने पत्रव्यवहार केला आहे. या नियोजनात त्यांच्याकडून सहकार्याची अपेक्षा आहे; मात्र नवी मुंबई महापालिकेकडून या संदर्भात अद्याप कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. पाणी, फिरते शौचालय सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी महापालिकेकडे मागणी केली आहे; मात्र पालिकेच्या अधिकाऱ्यांनी या संदर्भात सरकारकडून निर्देश नसल्याचे सांगितले. यावरून सरकार या मोर्चाला गंभीरपणे घेत नाही, असा आरोप यावेळी विनोद पोखरकर यांनी केला आहे. संध्याकाळी उशिरा महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर आणि महापालिका संबंधित अधिकारी यांची या विषयावर एक बैठक सुरू होती. त्या बैठकीत या आंदोलनकर्त्यांना सुविधा देण्यावर निर्णय घेतला जाणार होता.
Rohit Pawar : रोहित पवार यांची आज ईडीकडून चौकशी, पळणारा नाही लढणारा दादा, राष्ट्रवादीनं लावले बॅनर

बाजार आवार बंद?

कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी बाजार आवारातील कामकाज गुरुवार, २५ जानेवारी रोजी बंद ठेवले जाणार आहे, अशी माहिती आहे. बाजार घटकांकडून याबाबत अधिकृत माहिती दिली जाणार आहे.
देशातील सर्वात श्रीमंत मुंबई महापालिकेच्या मुदत ठेवी घटल्या, वर्षभरात ‘इतक्या’ कोटींच्या ठेवी कमी

वाहनांना प्रवेशबंदी

नवी मुंबई २५ जानेवारी रोजी रात्री १२ ते २६ जानेवारी रात्री ११ वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या जड-अवजड मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना शहरात प्रवेश करण्यास, वाहने उभी करण्यास, शहरातील सर्व मार्गावरून मार्गस्थ होण्यास बंदी घालण्यात आली आहे.
शरद पवारांकडून यशवंतरावांचं पुस्तक देत आशीर्वाद, सुप्रिया सुळेंच्या हाती संविधान, रोहित पवार ईडी चौकशीला हजरRead Latest Maharashtra News And Marathi News

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.