Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

तलाठी भरती २०२३ ची निवड यादी आणि Waiting List जाहीर; असा तपासा निकाल

24

Talathi Bharti Result 2023 : महाराष्ट्र महसूल विभागाने महाराष्ट्र तलाठी परीक्षेचा अंतिम निकाल आज, २४ जानेवारी २०२४ रोजी महाभूमीच्या अधिकृत वेबसाइट www.mahabhumi.gov.in वर प्रसिद्ध करण्यात आला आहे. तलाठी भरती २०२३ ची निवड यादी जाहीर झाली आहे. त्याचबरोबर निवड यादीसोबत प्रतिक्षा यादीही जाहीर झाली आहे. महसूल विभागाकडून जिल्हानिहाय यादी जाहीर करण्यात आली आहे.

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई शहर, मुंबई उपनगर, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, बुलढाणा, वाशिम, परभणी, लातूर, जालना, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा, छत्रपती संभाजी नगर, धाराशिव आणि हिंगोली अशा राज्यातील २३ जिल्ह्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर करण्यात आली आहे.

तलाठी अंतिम गुणवत्ता यादी २०२३-२४ सर्व जिल्ह्यांसाठी PDF स्वरूपात प्रसिद्ध करण्यात आली असून, उमेदवार त्यांचे तलाठी भरतीचे अंतिम निकाल खाली शेअर केलेल्या थेट लिंकद्वारे डाउनलोड करू शकतात. पीडीएफमध्ये उमेदवारांची नावे, रोल नंबर आणि गुण यांचा उल्लेख आहे.

निवड यादी व प्रतिक्षा यादी प्रसिध्दीनंतर उमेदवाराची ओळख, प्रमाणपत्रे व संबंधित कागदपत्रे पडताळणी, वैद्यकीय तपासणी, चारित्र्य पडताळणी याचप्रमाणे समांतर आरक्षणाप्रमाणे कागदपत्रांची पडताळणी ही अंतिम नियुक्तीपुर्वीची कार्यवाही संबंधित जिल्हा निवड समितीकडून जिल्हास्तरावर करण्यात येईल, असे महसूल विभागाकडून सांगण्यात आले आहे

१७ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर २०२३ या कालावधीत तीन टप्प्यात या परीक्षा ५७ सत्रांमध्ये घेण्यात आल्या होत्या. या तलाठी पदाच्या परीक्षेसाठी राज्यभरातून १० लाख ४१ हजार ७१३ परीक्षार्थीनी अर्ज दाखल केले होते. यापैकी ८ लाख ६४ हजार ९६० उमेदवारांनी परीक्षा दिली होती.

संपूर्ण परीक्षेत एकूण प्रश्नांपैकी २८३१ प्रश्नांवर १६ हजार २०५ आक्षेप उमेदवारांकडून नोंदवले होते. या आक्षेपांपैकी एकूण वैध १४६ प्रश्नांसाठी घेतलेले ९०७२ आक्षेप परीक्षा घेणाऱ्या टीसीएस कंपनीकडून योग्य ठरविण्यात आले. त्यानुसार सामान्यीकरण पद्धतीने परीक्षेमध्ये ४८ उमेदवारांना २०० पेक्षा जास्त सामान्यीकृत गुण मिळाले आहेत.
MAHA तलाठी निकाल 2023 डाउनलोड करण्यासाठी :

पायरी १ : http://mahabhumi.gov.in ला भेट देऊन महाराष्ट्र महसूल विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर नेव्हिगेट करा.

पायरी २ : मुख्यपृष्ठावर, “महत्त्वाचे दुवे” विभाग शोधा, जिथे तुम्हाला “तलाठी निकाल 2023” ची लिंक मिळेल.

पायरी ३ : “तलाठी भरती 2023-24 महसूल विभाग, महाराष्ट्र राज्य” नावाच्या नवीन पृष्ठावर प्रवेश करण्यासाठी लिंकवर क्लिक करा. तेथून, “महाराष्ट्र तलाठी निकाल” निवडा.

पायरी ४ : तुमच्या स्क्रीनवर प्रदर्शित तलाठी निकाल 2023 गुणवत्ता यादीची PDF डाउनलोड करा.

पायरी ५: तलाठी निकाल 2023 मध्ये तुमचा रोल नंबर शोधा आणि भविष्यातील संदर्भासाठी माहिती जतन करा.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.