Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; यंदाच्या बोर्डाच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना १० मिनिटांचा अधिक वेळ
Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education च्या दहावी आणि बारावीची परीक्षा देणाऱ्या परीक्षार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी Exam Hall मध्ये (परीक्षा दालनात) प्रश्नपत्रिकांचे वाटप परीक्षेच्या निर्धारीत वेळेपूर्वी दहा मिनिटे अगोदर करण्यात येत होते.
मुलांना उत्तर पत्रिका वाचता यावी तसेच त्याचा अंदाज घेता यावा यासाठी परीक्षा सुरू होण्याच्या आधी प्रश्न पत्रिका आणि उत्तर पत्रिकेचे वाटप केले जात होते.मात्र, पेपर फुटीच्या घटना घडल्या होत्या.अशा प्रकारच्या घटनांना प्रतिबंध व्हावा तसेच परीक्षा निकोप, भयमुक्त व कॉपीमुक्त वातावरणात सुरळीत पार पडाव्यात यासाठी परीक्षेच्या निर्धारीत वेळेपूर्वी दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका वितरीत करण्याची सुविधा फेब्रुवारी-मार्च 2023 परीक्षेपासून रद्द करण्यात आलेली होती.
यामुळे विद्यार्थ्यांना प्रश्न पत्रिका वाचून प्रत्यक्ष उत्तरे लिहिण्यासाठी उशीर लागत होता. त्यामुळे त्यांना वेळ कमी पडत होता. म्हणूनच, मुलांना वेळ वाढवून देण्यात यावा अशी मागणी केली जात होती. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेत पालक, विद्यार्थ्यांच्या मागणीचा विचार करून दहा मिनिटे परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर दिली जाणार आहेत. गेल्या वर्षी देखील वेळ वाढवून देण्यात येत आहे.
सकाळ सत्रात परीक्षा असणार्या विद्यार्थ्यांना सकाळी १०.३० वाजता परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे आवश्यक असणार आहे. हे पेपर सकाळच्या सत्रात ११ वाजता पेपर सुरू होणार आहेत. तर, दुपार सत्रातील पेपर ३ वाजता पेपर सुरू होणार असल्याने २.३० वाजता वर्गात येवून बसावे लागणार आहे.
दहावी आणि १२ वीच्या परिक्षाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. या परीक्षेची जोरदार तयारी मुले करत आहेत. बारावीची लेखी परीक्षा ही २१ फेब्रुवारी ते २३ मार्च दरम्यान, होणार आहे. तर, दहावीची लेखी परीक्षा १ मार्च ते २६ मार्च या कालवधीत होणार आहे. फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणार आहेत.