Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

new guidelines for ganeshotsav: बाप्पाचे प्रत्यक्ष मंडपात येऊन दर्शन घेण्यावर प्रतिबंध; पाहा, महापालिकेची संपूर्ण नवी नियमावली

20

हायलाइट्स:

  • गणेशोत्सवासाठी मुंबई महापालिकेची नवी नियमावली जाहीर.
  • नव्या नियमावलीनुसार प्रत्यक्ष सार्वजनिक गणेशोत्सव मंडपात जाऊन गणेशदर्शन घेण्यावर प्रतिबंध.
  • लोकांनी सार्वजनिक गणेशमंडळाच्या बाप्पाचे ऑनलाइन दर्शन घ्यावे- महापालिकेची सूचना.


मुंबई: दरवर्षी धुमधडाक्यात साजरा होणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सवावर यंदा करोनाचे सावट असल्याने तो अत्यंत साधेपणाने साजरा केला जाणार आहे. विशेष म्हणजे करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता मुंबई महानगरपालिकेने आपल्या गणेशोत्सवाबाबतच्या नियमावलीत सुधारणा केली आहे. त्यानुसार यावेळी लोकांना सार्वजनिक गणेशोत्सव मंडपात प्रत्यक्ष जाऊन श्रीगणेशाचे दर्शन घेण्यावर प्रतिबंध लावण्यात आला आहे. लोकांनी सार्वजनिक मंडळांच्या बाप्पांचे ऑनलाइन दर्शन घ्यावे अशी सूचना महापालिकेने मुंबईकर गणेशभक्तांना केली आहे. (prohibition on visiting the actual pendal of ganeshotsav see the new guidelines by bmc for ganeshotsav)

मुंबई महानगरपालिकेने मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सवासाठी जून महिन्यात नियमावली जाहीर केली होती. त्यात सार्वजनिक मंडळाच्या बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी गणेशभक्तांनी मास्कचा वापर करून शारीरिक अंतर पाळणे, तसेच स्वच्छतेचे नियम पाळण्याबाबत सूचना केल्या होत्या. मात्र तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेत महापालिकने आज या नियमात सुधारणा करून बाप्पाचे प्रत्यक्ष मंडपात येऊन दर्शन घेण्यावर प्रतिबंध घातला आहे. यासाठी महापालिकेने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना महत्वाचे निर्देश दिले आहेत.

क्लिक करा आणि वाचा- राजू शेट्टी यांचा आघाडी सरकारसह केंद्र सरकारवर गंभीर आरोप; दिला इशाराही

मुंबईतील अनेक गणेशोत्सव मंडळानी गणेशभक्तांना पूजेसाठी पास वितरित करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र यानंतर महापालिकेने नवा नियम जाहीर केला. याचे कारण म्हणजे करोनाच्या संकटकाळात मंडपात होणारी गर्दीचे नियोजन करण्यात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी असमर्थता दाखली गे आहे. ‘लालबागचा राजा’च्या मंडळानेही बाप्पाच्या मुखदर्शनाची तयारी सुरू केली होती. मात्र आता त्यांना ऑनलाइन दर्शनाची व्यवस्था करावी लागणार आहे.

क्लिक करा आणि वाचा- मरीन ड्राइव्हजवळ कार अचानक पेटली; CNG किटचा स्फोट, कारमध्ये होते दोन प्रवासी

काय आहे मुंबई महापालिकेची नवी नियमावली?

महापालिकेच्या नव्या नियमावली नुसार करोनाला प्रतिबंध घालण्यासाठी खालील नियम पाळणे बंधनकारक असणार आहे.

> करोना प्रतिबंधक लशीच्या दोन मात्र घेतलेल्या केवळ १० स्वयंसेवकांना बाप्पाचे आगमन आणि विसर्जन करण्याची परवानगी असेल.
> या स्वयंसेवकांनी लशीची दुसरी मात्र घेऊन १५ दिवसांचा कालावधी पूर्ण केलेला असावा.
> घरगुती बाप्पाचे आगमन आणि विसर्जनासाठी फक्त कुटुबातील पाच लोकांना परवानगी असेल.
> या पाच लोकांनी देखील करोना प्रतिबंधक लशीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या असल्या पाहिजेत. तसेच दुसरी मात्रा घेऊन त्यांचा १५ दिवसांचा कालावधी पूर्ण झालेला असायला हवा.
> विसर्जनापूर्वी बाप्पाची मूर्ती कलेक्शन सेंटर, कृत्रिम तलाव किंवा नैसर्गिक विसर्जन स्थळी विसर्जनासाठी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडे सोपवावी लागणार आहे.
> लोकांना बाप्पाच्या विसर्जनाची परवानगी देण्यात आलेली नाही. महापालिकेने विसर्जनासाठी शहरातील २४ वॉर्डात १७३ कृत्रिम तलावांची निर्मिती केली आहे.
> विसर्जन स्थळावर जाण्यास मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना मज्जाव करण्यात आला आहे.
> विसर्जनासाठी नेत असताना बाप्पाचे वाहन रस्त्यात दर्शनासाठी थांबवण्यास प्रतिबंध असणार आहे.
> एखाद्या इमारतीतील किंवा वस्तीमधील गणेशमूर्ती एकाच विसर्जन स्थळी नेण्यात येणार नाही.

क्लिक करा आणि वाचा- ‘भाजपने फालतू गप्पा मारू नयेत, बेळगाव महाराष्ट्राचेच आहे की नाही एवढेच स्पष्ट करावे’

कंटेनमेंट झोनसाठी विशेष नियम

कंटेनमेंट झोनमध्ये येणाऱ्या सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्तींचे विसर्जन एकतर मंडपात केले जाईल किंवा ते काही दिवसांनी केले जाईल, असे महापालिकेने म्हटले आहे. याशिवाय, कोरोनामुळे सीलबंद केलेल्या घरांच्या मूर्तींचेही घरातच विसर्जन केले जाईल.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.