Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

सुपारी किलींगच्या माध्यमातुन जिवे मारण्याचा प्रयत्न करणारे स्थागुशा पथकाचे ताब्यात…..

6

उमरेड हद्दीत सुपारी किलींग प्रकरणात  गोळीबार करून पसार होणाऱ्या आरोपींना स्थागुशा पथकाने केली अटक,निवडनुकीत हारण्याचा वचपा काढण्यासाठी सुपारी देऊन जिवे मारण्याचा प्रयत्न   मुख्य सुत्रधार स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

उमरेड(नागपुर) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,उमरेड हद्दीत मौजा मांगरुळ या गावात येथे दि. २३/०१/२०२४ रोजी यातील फिर्यादी (जखमी) गब्बर देवराव रेवतकर हे दि. २३/०१/२०२४ चे सकाळी ०४/३० वा. सुमारास नेहमी प्रमाणे झोपेतून उठुन मॉर्निंग वॉक करीता निघाले व घराचे समोरील रोडवर मॉर्निंग वॉक करित असतांना ०४:४५ वा ते ०५:०० वा. दरम्यान गावातील बालपांडे
यांच्या घराकडुन एक मोटार सायकलवर दोन अनोळखी इसम फिर्यादीचे पाठीमागुन येवुन फिर्यादीला जिवानिशी ठार मारण्याचे उददेशाने बंदुकीने फिर्यादीच्या मागुन फिर्यादीवर फायरींग केली.
त्यामध्ये फिर्यादीचे चेहऱ्यावर उजव्या बाजुस ओठाच्या खाली बंदुकीचा छर्रा लागुन जखमी करून मोटार सायकलकवरील दोन अनोळखी इसम हे मोटार सायकलसह पळुन गेले. अशा फिर्यादीच्या तोंडी रिपोर्टवरून पोस्टे उमरेड अप. क्र. १५/२४ कलम ३०७, ३४ भादंवि, सहकलम ३, २५ भा. सशस्त्र अधि. १९५९ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला.
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून नागपूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक  हर्ष ए. पोद्दार (भा.पो.से.) यांनी पोलिस स्टेशन उमरेड व स्थानिक गुन्हे शाखा, नागपूर ग्रामीण विशेष पथक तयार करुन आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले.होते त्याअनुषंगाने आज दि २४ रोजी पोस्टे उमरेड अप. क्र १५/२०२४ कलम ३०७, ३४ भादवि R/W३,२५
भा.ह. का गुन्हयाचे समांतर तपासामध्ये स्थागुशा पथकाद्वारे गोपनीय बातमीदार तपास कौशल्य, तांत्रिक पुराव्याच्या  आधारे
आरोपींना ताब्यात घेऊन आरोपींना सखोल विचारपूस केली असता आरोपी क्रमांक

२) कार्तिक रामेश्वर पंचबुदे वय २६ वर्ष रा. मंगरूळ ता उमरेड ता नागपूर

३) लक्ष्मण तुकाराम राठोड वय ४० वर्ष रा. तेलकवडसी ता. उमरेड
नागपूर यांनी माहिती उघड केली की

आरोपी क्र. १) अमोल उर्फ रामेश्वर विठ्ठल गंधारे वय ३० वर्ष रा मंगरूळ ता उमरेड नागपूर हा त्यांचे गावाचे निवडणुकीत फिर्यादी चे विरोधात उभा होता. तसेच आरोपी क्र. १ हा अवैध दारूचा व्यवसाय करतो त्याबाबत फिर्यादी गावात तक्रारी करतो या वैमनस्यावरून आरोपी क्र. १ ने इतर आरोपी यांना पैशाचे प्रलोभन देऊन फिर्यादीस आरोपी क्र ३ जवळील बंदुकीने जीवे ठार मारण्यास सांगितल्याने आरोपी क्र. २ हा घटनेच्या आदल्या दिवशी रात्री दरम्यान आरोपी क्र. ३ चे घरी मोटारसायकल ने  जाऊन मुक्कामी थांबून घटने दिवशी पहाटे आरोपी क्रमांक ३ सह मोटर सायकलने गावात येऊन आरोपी क्र. १ नी दिलेल्या माहितीप्रमाणे फिर्यादी पहाटे घरून निघून गावात
पायदळ फिरत असताना आरोपी क्र२ व ३ यांनी मोटारसायकलवर  फिर्यादीचा पाठलाग करून आरोपी क्र ३ ने त्याच्या जवळील
भरमार गावठी बंदुकीने फिर्यादीवर गोळी झाडून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करून मोटर सायकल ने पळून गेल्याचे सांगितले आरोपी क्र ३ जवळून गावठी भरमार बंदूक तसेच आरोपी क्र २ जवळून मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.
यातील आरोपी क्र. १) अमोल उर्फ रामेश्वर विठ्ठल गंधारे वय ३० वर्ष रा मंगरूळ ता उमरेड नागपूर याला पोस्टे उमरेड यांनी त्याच्या धाब्यावरून अटक केली. तसेच आरोपी क्र. १ याचेवर यापुर्वी पोस्टे उमरेड येथे दारू, वेश्याव्यवसायासाठी अपहरण करणे यासारखे गुन्हे दाखल असुन आरोपी क्र. ३ याचेविरूद्ध पोस्टे बेला येथे दोन
खुनाचे गुन्हे दाखल आहेत.
सदरची कार्यवाही ही पोलिस अधीक्षक नागपुर ग्रामीण  हर्ष ए. पोद्दार (भा.पो से) तसेच अपर पोलिस अधीक्षक डॉ.संदीप पखाले यांचे मार्गदर्शनात उपविभागीय पोलिस अधिकारी उमरेड विभाग राजा पवार,पोलिस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे स्था.गु.शा. पोस्टे उमरेड येथील तत्कालीन प्रभारी पोलिस निरीक्षक महेश भोरटेकर, सहायक पोलिस निरीक्षक आशिषसिंग ठाकुर, पोलिस उपनिरीक्षक वाघ, सहायक फौजदार चंद्रशेखर घडेकर, पोहवा राधेश्याम कांबळे, प्रमोद तभाने, संजय बांते, पंकज बट्टे, प्रदीप चवरे यांनी पार पाडली.

Leave A Reply

Your email address will not be published.