Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
corona latest updates: राज्यात आज करोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत वाढ झाल्याने चिंता; मात्र ‘हा’ दिलासा!
हायलाइट्स:
- गेल्या २४ तासांत राज्यात ४ हजार १७४ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.
- गेल्या २४ तासांमध्ये एकूण ४ हजार १५५ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
- आज राज्यात एकूण ६५ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आज राज्यात झालेल्या ६५ रुग्णांच्या मृत्यूंनंतर राज्याच्या मृत्यूदर २.१२ टक्क्यांवर स्थिर आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ६३ लाख ०८ हजार ४९१ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०९ टक्के इतके झाले आहे.
क्लिक करा आणि वाचा- बाप्पाचे प्रत्यक्ष मंडपात येऊन दर्शन घेण्यावर प्रतिबंध; पाहा, महापालिकेची नवी नियमावली
राज्यातील सक्रिय रुग्णसंख्या किंचित घटली
आज राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ४७ हजार ८८० इतकी आहे. तर काल ही संख्या ४७ हजार ९२६ इतकी होती. या बरोबरच राज्यातील सक्रिय रुग्णांचा जिल्हानिहाय विचार करता पुणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. पुणे जिल्ह्यात हा आकडा १२ हजार ३६४ वर गेला आहे. ठाणे जिल्ह्यात मात्र ही संख्या वाढून ती ७ हजार ४९७ वर आली आहे. त्या खालोखाल साताऱ्यात ही संख्या ५ हजार ०६१ इतकी खाली आली आहे. अहमदनगरमध्ये ही संख्या ५ हजार २६३ अशी वाढली आहे. तर, सांगलीत एकूण २ हजार ९४४ अशी वाढली आहे. तसेच, सोलापुरात ही संख्या २ हजार ६६१ वर पोहोचली आहे.
क्लिक करा आणि वाचा- राजू शेट्टी यांचा आघाडी सरकारसह केंद्र सरकारवर ‘हा’ गंभीर आरोप
मुंबईत उपचार घेत आहेत ४,४३५ रुग्ण
मुंबई महापालिका हद्दीत सक्रिय रुग्णांच्या संख्या ४ हजार ४३५ इतकी आहे. तर, रत्नागिरीत १ हजार ०८०, सिंधुदुर्गात ८३१, नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ७९९ इतकी आहे.
धुळे जिल्ह्यात एकही सक्रिय रुग्ण नाही
या बरोबरच, औरंगाबादमध्ये ४२०, नागपूर जिल्ह्यात ही संख्या ७८ इतकी वाढली आहे. अमरावतीत ही संख्या ७५ वर आली आहे. तर भंडारा जिल्ह्यात फक्त एक सक्रिय रुग्ण असून धुळ्यात मात्र एकही रुग्ण नाही.
क्लिक करा आणि वाचा- मरीन ड्राइव्हजवळ कार अचानक पेटली; CNG किटचा स्फोट, कारमध्ये होते दोन प्रवासी
३,०७,९१३ व्यक्ती होम क्वारंटाइन
आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी ५३ लाख ३८ हजार ७७२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४ लाख ९७ हजार ८७२ (११.७४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३ लाख ०७ हजार ९१३ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, १ हजार ९३७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.